आत्ता ठाण्याहुन पनवेलला जाणारी लोकल ट्रेन पकडली. रबाले स्टेशनवर एक जोडपं गाडीत चढलं. तो पंचवीस सव्वीस वर्षाचा असेल, ती एखाद्या दुसऱ्या वर्षाने लहान. टिपिकल खांद्यापर्यंत वाढलेले केस, कानात रिंग, नको त्या (ठिक) ठिकाणी कापलेली जीन्स पायात फ्लोटर्स अशा अवतारात तो. आणि गुलाबी रंगाचा शर्टवजा टॉप, त्याच्या सारखीच जीन्स , बॉयकट अशा अवतारातली ती. तीला खिड़कीजवळची सीट मिळाली सुदैवाने, माझ्या समोरची. तो थोड़ा वेळ उभा राहिला, पण लवकरच त्यालाही सीट मिळाली…
बसल्या बसल्या त्याने तिच्या खांद्यावर डोके टेकवले आणि डोळे मिटून घेतले. तिने त्याच्या केसातून लाडिकपणे हात फिरवायला सुरुवात केली. अगदी टिपिकल… माझ्या शेजारी बसलेले एक काका, एकदा त्यांच्याकडे तर एकदा माझ्याकडे बघत तोंड वाकडं करायला लागले. मला सुद्धा ते थोडं खटकलं होतंच (खरं तर खटकायला नकोय, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता). पण अगदीच बालिश वाटत होते दोघेही.
पण त्याच्या केसातून हात फिरवता फिरवता ती म्हणाली…
“डोन्ट वरी यार, चार लाखाची व्यवस्था झालीय आपली ऑलरेडी. अजुन तीन उभे करायचेत फ़क्त डाऊनपेमेंटसाठी. करु काहीतरी. पर्सनल लोन मिळते का ते पाहू? अजून एखादा पार्ट टाइम जॉब शोधते मी संध्याकाळसाठी. ही संधी सोडायची नाही. घर बुक करुच. ”
तो लगेच ताठ उठून बसला. ” गुड़ आयडिया, मी पण शोधतो, अजुन एखादा पार्ट टाइम जॉब. लढुयात!”
मला एकदम आम्ही घरासाठी केलेली वणवण आठवली.
तुर्भे स्टेशनला दोघेही हसत हसत उतरले. मी मागून हाक मारली…
“हॅलो…
त्याला वाटले काही राहीले की काय त्यांचे गाडीत, त्याने खिसा, सॅक चाचपली. मी हसुन हातानेच काही नाही अशी खुण केली, गाड़ी पास होता होता ओरडुन म्हणालो…
” All the best friends !”
गाडीने वेग घेतला होता पण त्याचे हसरे चेहरे मला आता अर्ध्या किलोमीटर वरुन सुद्धा स्पष्ट दिसले असते.
आपण उगीचच बाह्यरूपावरुन काहीही ग्रह करून घेतो ना एखाद्याबद्दल?
विशाल कुलकर्णी
Vilas Kulkarni
जानेवारी 5, 2017 at 8:06 pm
Jhakas !!
2017-01-05 19:02 GMT+05:30 ” ऐसी अक्षरे मेळवीन !” :
> अस्सल सोलापुरी posted: “आत्ता ठाण्याहुन पनवेलला जाणारी लोकल ट्रेन पकडली.
> रबाले स्टेशनवर एक जोडपं गाडीत चढलं. तो पंचवीस सव्वीस वर्षाचा असेल, ती
> एखाद्या दुसऱ्या वर्षाने लहान. टिपिकल खांद्यापर्यंत वाढलेले केस, कानात रिंग,
> नको त्या (ठिक) ठिकाणी कापलेली जीन्स पायात फ्लोटर्स अशा अवतार”
>
अस्सल सोलापुरी
जानेवारी 6, 2017 at 1:38 pm
Thanks Dada !
Ashwini
जानेवारी 8, 2017 at 3:40 pm
माणूस फार विचित्र प्राणी आहे नाही का?
छान आहे.
rahulGwaghchaure
जानेवारी 18, 2017 at 2:21 pm
वर्तुळ भाग ५ कधी येणारे सर😂
rahulGwaghchaure
जानेवारी 18, 2017 at 2:23 pm
वर्तुळ भाग ५ कधी येणार आहे सर …..😂😂😂😂😂😂😂😂😂😫😫😫😫😫😫
rahulGwaghchaure
जानेवारी 18, 2017 at 2:27 pm
गाडीने वेग घेतला होता पण त्याचे हसरे चेहरे मला आता अर्ध्या किलोमीटर वरुन सुद्धा स्पष्ट दिसले असते. NB👍👍👍👍👍👍👎👍
BS Jain
फेब्रुवारी 27, 2017 at 8:54 pm
Chhan lihilay, Vishal … Pls ignore late response !
Sandesh Sogam
नोव्हेंबर 16, 2017 at 6:37 pm
विविधरंगी माणूस नावाचा प्राणी….