RSS

हीरण हलकारी जोबनवाली नदी रुपाळी नखराळी

20 जुलै

मागच्या काही दिवसात असेच एका पावसाळी शनिवारी कीं रविवारी गाढी (गाढेश्वरी) नदीच्या काठाकाठाने पावसात भिजत फिरताना गाढीचे ते वेल्हाळ रूप पाहून वारंवार एक जाणीव होत होती कि हे आपण कुठेतरी बघीतलेले, अनुभवलेले आहे. त्यात गाढीबरोबर फिरताना नेहमीपेक्षा जरा जास्तच गोड दिसत असलेल्या माझ्या सहधर्मचारिणीला पाहताना ती भावना जास्त प्रबळ होत होती. कि हे पूर्वी कुठे तरी अनुभवलंय…. पण नक्की आठवत नव्हतं.

13680633_1210019842364609_5197078206524767773_n

13700205_1210019915697935_6757235103395784660_n

13718669_1210019885697938_6010267077606159271_n

आज नामवंत गुजराती लेखक श्री ध्रुव भट्ट यांचे ‘अकुपार’ पुन्हा एकदा वाचताना या कोड्याचा उलगडा झाला. कथेच्या नायकाला गीरच्या वास्तव्यात भेटलेला एक अंध मालधारी (गुराख्याची एक जात) , ज्याने आयुष्यात कधीही प्रकाश बघितलेला नाही तो गिरच्या लेकीचं ” हीरण नदीचं ” सौंदर्य वर्णन करताना तिथल्या स्थानिक भाषेतलं एक गाणं ऐकवतो. त्या नायकालाही ते गाणं पुरतं समजलेलं नसतं, मलाही यातल्या खूप शब्दांचा अर्थ लागलेला नाहीये. पण त्यामागचं विलक्षण प्रेम, गीरबद्दलची, विशेषतः हीरण नदीबद्दलची आत्मीयता त्या गाण्यात जाणवत राहते. गिरमधल्या रहिवाशांचे गिरशी, निसर्गाशी, सृष्टीशी असलेले नाते गडद होत जाते, उमजत जाते. शब्दांचे अर्थ कळत नाहीत पण कसा कोण जाणे त्या गाण्याचा भाव आपल्या मनापर्यंत सहज पोचत राहतो. अनेक भाषामधली अनेक विषयांवरची गाणी ऐकली, वाचली आहेत. पण स्पेशली एका नदीवर लिहिलं गेलेलं हे पहिलंच गाणं वाचायला मिळालं. (ज्या दिवशी अशाच कुणा स्थानिक गुराख्याकडून ऐकायला मिळेल तो सुदिन) ….

डुंगरथी दडती घाट उतरती पडती न पडती आखडती
आवे उछळती जरा न डरती डगलां भरती मदझरती
किलकारा करती जाय गरजती घोराळी
हीरण हलकारी जोबनवाली नदी रुपाळी नखराळी

आंकडीयावाळी हेलळियाली वेल्युवाळी वखवाळी
अवळा आंटाळी जामी जाळी भेखाडियाळी भेवाळी
तेने दई ताळी जातां भाळी लाख हिल्लोळी नखराळी
हीरण हलकारी जोबनवाली नदी रुपाळी नखराळी

आंबा आंबलियु उंब उंबरीयूं खेर खिजडियूं बोरडीयु
केहुडा कळियूं वा वखारीयुं हेमनी कळियु आवळियुं
प्रथवी उतरयुं सरगी परीयुं वळियुवाळी जळधारी
हीरण हलकारी जोबनवाली नदी रुपाळी नखराळी

संदर्भ पुस्तक : अकुपार
लेखक : ध्रुव भट्ट

तळटीप : कुणाला कृपया हि भाषा कळत असेल तर कृपा करून मला अर्थ सांगू नका. यातली भावना माझ्यापर्यंत जशी पोचलीय ती तशीच राहू द्या. 🙂

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: