काही दिवसांपुर्वी इथेच फ़ेसबुकवर श्री. वैभव कुलकर्णी Vaibhav Coolkarni यांची ओळख झाली. माझा डेनव्हर कोलोराडो येथील बुल रायडींगच्या चित्तथरारक खेळावर लिहीलेला लेख त्यांना आवडला होता. त्यांनी आवर्जुन मैत्री केली, या विषयावर तसेच एकंदरीत लेखनावर सुद्धा खुप बोललो आम्ही. ते ASEMPL (अथर्व सांगलीकर एंटरटेनमेंट & मिडीया प्रा.लि.) तर्फ़े प्रकाशित होणार्या “मित्रांगण” या त्रैमासिकाचे संपादक आहेत. बोलता बोलता त्यांनी सहजच मला ’मित्रांगण’च्या शिक्षण विशेषांकासाठी ’मलाला’वर लेख लिहीशील का असे विचारले? नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मी त्यांना लेख दिला आणि विसरून गेलो. आजपर्यंत खुपशी वर्तमानपत्रे, मासिके, ई-विशेषांक यातून लिहीलेले आहे. पण त्रैमासिक प्रकाशित झाल्याबरोबर त्याच्या एका प्रतीबरोबर रुपये १००० मानधनाचा चेकही पाठवून देणारे ASEMPL चे मित्रांगण हे पहिलेच.
(अर्थात आवड म्हणून, मराठीवरचे प्रेम जपण्यासाठी म्हणून ई विशेषांक प्रकाशित करणार्या आणि ते विनामुल्य वितरीत करणार्या रसिक कलावंतांकडून मानधनाची अपेक्षा मी कधीच ठेवलेली नाही. अशा कलावंतांसाठी माझे साहित्य कधीही विनामुल्य उपलब्ध असेल)
प्रिय मलाला … (मित्रांगण त्रैमासिक)
30
एप्रिल
vaibhav14476
मे 6, 2014 at 10:30 pm
धन्यवाद