RSS

सु.शिं.च्या अर्पणपत्रिका….

07 ऑक्टोबर

काही दिवसांपूर्वी आंतरजालावर सर्च करताना चेपुवर एक सु.शिं.ना वाहीलेले पान सापडले. तिथे सुशिंनी त्यांच्या पुस्तकांसाठी लिहीलेल्या काही अर्पण पत्रिका सापडल्या. त्या जशाच्या तशा इथे कॉपी पेस्ट करतोय. पुढेही जमतील तसे अपडेट करत जाईनच. सुशिंच्या प्रत्येक पुस्तकाची अर्पणपत्रिका वाचणे हा देखील एक तितकाच भन्नाट अनुभव असतो.

चेपुवरील पानाचा दुवा : http://www.facebook.com/pages/Suhas-Shirvalkar/194406710654163?ref=ts

सुशिंच्या पुस्तकांप्रमाणेच त्यांच्या अर्पणपत्रिका देखील अप्रतिम आहेत. सुशिंच्या पुस्तकांच्या अर्पणपत्रिका किती समर्पक असायच्या ते सर्वांनाच माहीत आहे. व पु काळे किंवा अजून काही हाताच्या बोटावर मोजण्याइतके लेखक सोडले तर ‘अशा’ अर्पणपत्रिका कुणाच्याच नाहीत. एखाद दुसऱ्या पुस्तकाची अशी अर्पणपत्रिका असू शकते. पण सुशिंच्या प्रत्येक पुस्तकाची अर्पणपत्रिका इतकी खास आणि मनाला भिडणारी आहे, की कुणाची काय हिम्मत अर्पणपत्रिका वाचल्यावर पुस्तक न वाचता खाली ठेवेल.

प्रत्येक लेखकाला कादंबरी लिहिता आली तरी त्याची अर्पणपत्रिका लिहिता येईलच असे नाही किंवा लिहिली तरी ती तितकिशि समर्पक असेलच असे नाही. सुशिंचा मात्र याबाबतीत हात धरणारा कोणी नाही. त्यांची अर्पण पत्रिकेची खास स्टाईल होती.

पाहूयात अशाच काही अर्पणपत्रिका :

दुनियादारी- ३ री आवृत्ती –
त्या सर्व वाचकांना,ज्यांनी ‘दुनियादारी’विकत घेतली,वाचनालयातून वाचली,मित्राची ढापली,वाचनालयाची पळवली…पण ‘दुनियादारी’वर मनापासून प्रेमच केलं!
त्यांनाही,ज्यांनी ‘दुनियादारी’च्या लोकप्रियतेचा मनापासून द्वेष केला!आणि….खेडं, गाव, शहर, नगर, व महानगरातील तमाम ‘कट्टा-गँग्ज’ना,ज्या ‘दुनियादारी’ जगल्या….जगतात..जगतील!
– सुहास शिरवळकर

क्षितिज
टिपकागदी शोषण-गुणधर्माने सारे अनुभव पचवून,
जिलेटिनच्या प्रक्षेपण- गुणधर्माने योग्य वेळी,
योग्य अनुभव रसिकांपर्यंत पोहचावणाऱ्या सर्व कलावंतांना
– सुहास शिरवळकर

जाता येता –
श्रावण ऐन बहरात असताना
लोणावळा / खंडाळ्यास
छत्री / रेनकोट न नेता सहल
काढण्याचा उत्साह असणाऱ्या
तरुण – तरुणींना
– सुहास शिरवळकर

चूक – भूल…देणे घेणे !
संधी,
एकदा निश्चित तुमचं दार ठोठावते.
दुसऱ्या वेळी.
ती आल्याचा भास होतो.
तिसऱ्यांदा.
ती यावी, असं वाटत.
चौथ्या वेळी,
आपण भासच खरा मानतों.
आणि, पाचव्या वेळीही.
ती खरंच आली,
तर…
आपण पहिल्या वेळेसारखच
बेसावध असतो !
– सुहास शिरवळकर

काटेरी –
त्या समस्तांना –
जे पंगूत्वाचा भांडवल न करता,
स्वयंपूर्ण जगण्याचा प्रयत्न करतात,
आणि
जे मानसिक अपंग नाहीत !
– सुहास शिरवळकर

झूम –
खानदानी मदयाचा आस्वाद घेत,
त्याचा आकंठ उपभोग घेण,
आणि…
खानदानी धुळीस मिळवत
मद्याने आपल्याला वापरणं …
यातली पुसट सीमा-रेषा ओळखून ,
वेळीच थांबू शकत असशील, तर
तुलाच… !
– सु.शि.

हृदयस्पर्श –
श्वासाचे अंतर
जन्म आणि मृत्यूत
येताच रडे जो,
जातो तो रड़वीत.
या रडण्यामधले दान
असे आयुष्य,
आयुष्यच व्हावे –
सुरेल…. सुंदर गीत !
– सुहास शिरवळकर

वास्तविक –
आयुष्यातून एक –एक माणूस
गळत जाण, किंवा
एक –एक माणसांण आपल्याला
वज़ा करत जाण…
शेवटी, स्वत:साठीची एक
शून्य पोकळी, अन त्या पोकळीत
स्वतःचाच शोध घेत
पोकळीच्या अस्थिरतेन
अखेरच्या श्वासापर्यंत
भिरभिरत राहाण …
म्हणजेच अंतिम वास्तव असेल का ?
– सुहास शिरवळकर

निदान –
योग्य वेळी ‘एक्झीट’ घेवून ,
आपल्या नसलेल्या अस्तित्वानेच
हुरहुर लावू शकण्याची कला साधलेल्या माणसांना …
– सुहास शिरवळकर

वेशिपलीकडे
नवीन पिढीतील त्या युवकांना –
करमणुकीची अन्य माध्यमं
ज्यांना फार काळ भुलवू शकत नाहीत !
– सु.शि.

बंदिस्त –
स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक ओळखून ,
मगच माणूस म्हणून मुक्त जीवन जगणाऱ्या
विचारी स्त्रियांना ….
– सु.शि.

कल्पांत –
सुनील दत्त के नाम
यह शख्स अभिनेता है,
नेता है ,
और इसके बावजूद
एक सच्चा इन्सान भी !
– सु.शि.

बरसात चांदण्यांची-
अभ्यास वगैरे सर्व सांभाळून
“लफडं” अफेअर मध्ये बदलण्यात
यशस्वी होणाऱ्या महाविद्यालयीन
युवकांना …..
– सुहास शिरवळकर

कोवळीक –
काकाचं कॅन्टीन …
त्या बाहेरचा बोधि-वृक्ष …
मागची टेकडी …
होस्टेल्स …
ग्राउंडचा ओटा…
‘वर्ग’ सोडून
बी. एम.सी .सी. तल्या सर्व पवित्र स्थळांना,
जिथे मी अज्ञानाचा
सज्ञान झालो !
– सु.शि.

मधुचंद्र – (द्वितीय आवृत्ती)
नूरजहां, सुरैया, वहिदा,
वैजयंतीमाला, मधुबाला, नूतन …
ते, माधुरी, श्रीदेवी, रेखा …
ते, ऐश्वर्या, राणी मुखर्जी,
प्रीती झिंटा, करिष्मा, काजोल …
– दर बदलत्या पिढीनुसार
पैकी कोणा ना कोणा अभिनेत्रीला
हृदय – सिंहासनावर स्थापित करूनही,
वास्तवाचे भान ठेवून,
तितक्याच उत्कट प्रेमाने
आपापले संसार सांभाळणाऱ्या
दर तरुण पिढीतील असंख्य तरुणांना !
-सुहास शिरवळकर

मधुचंद्र : (प्रथमावृत्ती)
‘विश्वामित्र’ पाहत असताना’मेनके’च्या ज्या प्रथम दर्शनाने मला ही कल्पना सुचली,त्या दर्शनाला-अर्थात,’भानुप्रिया’ला ही, नित्या क्षणी माझ्यासकट सर्वांचाच’विश्वामित्र’ करणाऱ्या सर्व यशस्वी कला-तंत्रज्ञांनाही! -सुहास शिरवळकर

थोडक्यात असं –
प्रकाशन व्यवसायातील प्रवृतींना
– ज्यांनी मला दिवाळीचे दिवस दाखवले,
आणि
अमावास्येच्या काळ्याकुट्ट रात्रीही !
– सुहास शिरवळकर

सावधान –

वाटेल ते धोके पत्करून, प्रेम – विवाह करणाऱ्या व हे विवाह यशस्वीपणे जगणाऱ्या जोडप्यांना

पळभर, जन …!

उत्पत्ती, स्थिती व लय हि त्रिसुर्ती निर्विकारपणे स्विकारणाऱ्या सर्व सामान्य महामानवांना …

निमित्तमात्र –

असंख्य निमित्तमात्रांना ज्यांना परिस्थितीचं सर्वंकषत्व अनुभवाने पटलं आहे !

दास्तान

यूं तो हर लम्हात इक बहाना है
दिल के रोने को, ऐ दोस्त !
रंज है तो सिर्फ इस बात का
के हर कोई अपनी ही
किसी बात पे रोता है !
जब किसी गैर की खातिर
छलकती है आँखे…
वहीं से एक दर्दभरी
दास्ताँ शुरू होती है !

– सुहास शिरवळकर

चेपु अर्थात फेसबुकवरील सर्व सुशिप्रेमींकडून साभार ! मनःपूर्वक आभार मित्रहो !!

विशाल कुलकर्णी

 

3 responses to “सु.शिं.च्या अर्पणपत्रिका….

 1. Mohana

  ऑक्टोबर 7, 2012 at 6:05 pm

  मस्त आहेत अर्पणपत्रिका. ’निदान’ दोनदा आली आहे मात्र.

   
 2. अभिषेक

  ऑक्टोबर 8, 2012 at 4:57 pm

  भारीच!

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: