RSS

माझी ’वाईट्ट’ व्यसनं : भाग १

27 ऑगस्ट

१९९३ ची गोष्ट ! कॉलेजच्या द्वितीय वर्षात होतो. केतन मेहताची नवी फिल्म रिलीज झाली होती. ‘माया मेमसाब’ ! बरीच चर्चा झाली होती या चित्रपटाबद्दल, त्यातल्या काही खास प्रसंगांबद्दल. साहजिकच आम्ही चार मित्र (चष्म्याच्या काचा साफ करुन) थिएटरवर पोचलो. जाताना मनात एकच भीती, कुणी ओळखीचे तर भेटणार नाही ना? खरंच सांगतो, चित्रपटांमध्ये बरंच काही होतं. पण आई शप्पत, थिएटरमधून बाहेर पडलो तेव्हा बाकी काही म्हणजे काही आठवायची इच्छा नव्हती. ओठावर एका गाण्याच्या चार पाच ओळी होत्या….

खयाल चलते है आगे आगे
मै उनकी छांवमें चल रही हूं…
न जाने किस मोमसे बनी हूं
जो कतरा कतरा पिघल रही हुं
मै सहमी रहती हूं नींदमें भी
कही कोई ख्वाब डस न जाये…..
मेरे सरहाने जलावो सपने
मुझे जरासी तो नींद आये….

सिनेमा कधी एकदा सुरु होतोय या एक्साईटमेंटमध्ये टायटल्सकडे दुर्लक्षच झालेले होते. ते नेहमीच होते म्हणा. त्यामुळे बाहेर आल्यावर पोस्टरवर गीतकाराचे नाव शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यावरही काही माहिती नव्हती. खिश्यात पुरेसे पैसेही नव्हते. काय करायचे? मग आमच्या बरोबर चित्रपट बघुन बाहेर पडलेल्या लोकांना अडवून विचारणे सुरु झाले. “तुम्ही सुरुवातीला दाखवतात ती कलाकारांची नावे बघीतलीत?”

लोक विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होते. पण एका काकांनी विचारले, “का रे बाबा? काय हवेय?”
थोडंसं बिचकतच त्यांना कारण सांगितलं. त्यांनी हसत हसतच उत्तर दिलं….

गुलजार!

गुलजारसाहेब

गुलजारसाहेब

गुलजारसाहेबांचं नाव याआधीही ऐकलं होतं. पण मुळातच राज कपुर आवडता असल्याने आम्हाला शैलेंद्रचं वेड. तसे थोड्या फार प्रमाणात मजरुह, साहिरही आवडायचे. थोड्याफार प्रमाणात एवढ्यासाठी की त्यावेळी गाणं आवडायचं, पण ते कुणी लिहीलय हे शोधण्याकडे फारसा कल नसायचा. आमच्यासाठी त्याचा गायकच देव असायचा. थँक्स टू गुलजारसाहेब ! थँक्स टू केतन मेहता, थँक्स टू माया मेमसाब . त्यादिवशी जर माया मेमसाब बघायला म्हणून गेलो नसतो तर कदाचित आहे तसंच रुटीन चालु राहीलं असतं. गायक आणि संगीतकार यांचेच गोडवे गाण्यात आयुष्य गेलं असतं. त्या गाण्याने आधी गुलजारसाहेबांचा शोध सुरु झाला. जस-जसे गुलजार साहेब आवडायला लागले तस-तसे इतर गीतकारांचीही माहिती मिळवणं सुरु झालं आणि शैलेंद्रच्या पलिकडेही एक खुप मोठं जग आहे हे लक्षात आलं. जसजसा खोलात जायला लागलो. साहिर, मजरुह वाचनात यायला लागले, तस तसं त्यांच्या प्रेमात पडत गेलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोपर्यंत कविता हा केवळ एक छंद होता. आता त्या छंदाचं रुपांतर व्यसनात झालं. श्रेय जातं गुलजारसाहेबांना ! पुढे कधीतरी २००५-६ च्या दरम्यान ’पुखराज’ हातात आलं….., ते वाचलं आणि गुलजारच्या इतरही कविता शोधायचा नाद लागला.

‘पुखराज’ या आपली मुलगी ‘बोस्की’ उर्फ मेघना गुलजारला समर्पित केलेल्या काव्यसंग्रहातली ‘पनाह’ ही कविता आतवर स्पर्शून गेली. अंतर्बाह्य ढवळून गेली.

उखाड़ दो अरज़-ओ-तूल खूंटों से बस्तियों के
समेटो सडकें, लपेटो राहें
उखाड़ दो शहर का कशीदा
कि ईंट – गारे से घर नहीं बन सका किसी का
पनाह मिल जाए रूह को जिसका हाथ छूकर
उसी हथेली पे घर बना लो
कि घर वही है
और पनाह भी
तुम्हारे हाथों में मैंने देखी थी अपनी एक लकीर, सोना !

(अरज्-ओ-तूल : लांबी रुंदी)

गुलजार, आता रोज कुठे ना कुठे भेटायला लागले. कधी चित्रपट गीतातून कधी गैर फिल्मी कवितांमधून. त्यांची आधी कुठल्यातरी हिंदी पत्रिकेत वाचलेली ही कविता नंतर बहुदा ‘पुखराज’ मध्येही घेतली होती. श्रद्धेचं महत्व,मानवी आयुष्यात तिची काय अहमियत आहे, काय जागा आहे? हे सांगण्याचा हा एक जगावेगळा अंदाज होता त्या वयात माझ्यासाठी तरी.

कुरआन हाथोंमें लेके नाबीना एक नमाज़ी
लबोंपे रखता था
दोनों आखोंसे चूमता था
झुकाके पेशानी यूँ अक़ीदतसे छू रहा था
जो आयत पढ़ नहीं सका
उनके लम्स महसूस कर रहा हो..

मैं हैराँ हैराँ गुज़र गया था..
मैं हैराँ हैराँ ठहर गया हूँ..

तुम्हारे हाथोंको चूमकर
छू के अपनी आँखोसे आज मैंने
जो आयतें पढ़ नहीं सका
उनके लम्स महसूस कर लिये हैं..

(नाबीना: अंध, पेशानी: माथा, अक़ीदत: श्रद्धा, लम्स: स्पर्श)

तुम्हारे हाथोंको चूमकर, छू के अपनी आँखोसे आज मैने….

आँखोसे छूकर ! आता या कल्पनेत नाविन्य राहीलेलं नाही, पण त्यावेळी १८-१९ वर्षाच्या त्या वयात ती कल्पनाच रोमांचित करुन टाकणारी होती. अशा पद्धतीने काही थेट आतपर्यंत जाऊन पोचणा्रं लिहीता येवु शकतं ही कल्पनाच नवीन होती माझ्यासाठी. पण त्यावेळी उर्दुच्या नावाने बोंबच होती. त्यामुळे गुलझारच्या कवितांमध्ये सौंदर्यस्थळ म्हणून वापरलेले शब्दही आमच्या दृष्टीने रसभंग करणारे ठरायचे कारण मुळात त्याचा अर्थच कळायचा नाही. त्यासाठी मग आम्ही एक नवीनच मार्ग शोधला. सोलापूरला सिद्धेश्वर मंदीराजवळच एक पीरबाबाची मजार आहे. तिथे माझ्या एका मित्राबरोबर (इरफ़ान काझी) नेहमी जायचो, त्यामुळे तिथल्या मौलवींशी ओळख झालेली होती. मग असे काही शब्द अडले की इकबालचचांना गाठायचे हा शिरस्ताच पडून गेला. चचा स्वत:देखील गालिबमियांचे भक्त होते. त्यामुळे त्यांच्याकडून गालिबबद्दलही खुप ऐकायला मिळायचं. इकबालचचांनीच अजुन एक वेड दिलं मला ते म्हणजे ‘संत कबीर’! (त्या बद्दल नंतर एखाद्या लेखात सविस्तर बोलुच)

मग एक दिवस कुणीतरी सांगितलं ‘अबे ‘इजाजत’ बघ बे, त्यात कसल्ली खतरा गाणी आहेत गुलजारची. ‘कतरा कतरा’ ओठात घोळवतच चित्रपटगृहाच्या बाहेर पडलो. शेवटचं कडवं आठवतय?

तुम ने तो आकाश बिछाया
मेरे नंगे पैरों में जमीन हैं
काँटे भी तुम्हारी आरजू हैं
शायद अयैसी ज़िंदगी हसीं हैं
आरजू में बहने दो
प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो
रहने दो ना.. ..

सुधाला नवर्‍याच्या सामानात सापडलेली त्याच्या प्रेयसीची डायरी तिला प्रचंड अस्वस्थ करुन टाकते. आपण, आपला नवरा आणि त्याची पुर्वाश्रमीची प्रेयसी माया यांच्या सच्च्या प्रेमात एक मोठा अडसर तर ठरत नाही आहोत ना? या कल्पनेने कातर झालेली सुधा आपल्यालाही हळवे करुन टाकते. तशात गुलजारसाहेब लिहून जातात …

“मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है….”

इजाजत मी त्यानंतर पुन्हा-पुन्हा बघीतला. कधी गुलजारच्या शब्दांसाठी तर कधी रेखासाठी. हो, या चित्रपटाने गुलजारबरोबरच आणखी एक व्यसन दिलं मला …
त्या वाईट्ट व्यसनाचं नाव आहे ‘रेखा’ ! असो…., त्याबद्दल परत कधीतरी !

मग गुलझारचं वेडच लागलं. पण त्यांच्या गाण्यांपेक्षाही त्यांच्या कवितेत जास्त रस होता मला. साध्या-सरळ पण थेट शब्दात मनाची कोंडी अचुकपणे व्यक्त करण्यात गुलझारचा हात धरणारं कोणी नसेल?

रात कल गहरी निंद मे थी जब
एक ताजा सफ़ेद कॅनवस पर
आतिशी, लाल सुर्ख रंगोसे
मैने रोशन किया था इक सुरज
सुबह तक जल गया था वह कॅनवस
रात बिखर गयी थी कमरेंमे

“मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है, सावन के कुछ भिगे भिगे दिन रखे है, और मेरे खत मे लिपटी रात पडी है, वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो” हे लिहीणारा गुलझार हाच होता का हा प्रश्न पडावा इतकं प्रखर आणि दाहक होतं हे. गुलजारची कविता ही त्याच्या अनुभवांतून आलेली होती. फाळणीनंतर घरादाराला मुकलेला एक अनाथ मुलगा. त्याच्या आयुष्यात घडत गेलेली अनेक स्थित्यंतरं हे त्याच्या कवितेचं मुळ असल्याने जे काही होतं ते अस्सल होतं. परिस्थितीचे, नशिबाचे अनेक चटके सोसुन शेवटी आपल्या अंगभुत तेजाला झळाळी मिळालेलं बावन्नकशी सोनं होतं. कदाचित त्यामुळेच गुलजारची लेखणी जास्त भावली.

सारा दिन मैं खून में लथपथ रहता हूँ
सारे दिन में सूख-सूख के काला पड़ जाता है खून
पपड़ी सी जम जाती है
खुरच खुरच के नाखूनों से
चमड़ी छिलने लगती है
नाक में खून की कच्ची बू
और कपड़ों पर कुछ काले काले चकते से रह जाते हैं
रोज़ सुबह अख़बार मेरे घर
खून में लथपथ आता है

आणि हाच ‘गुलजार’ एका कवितेत लिहून जातो…

गर्मी सें कल रात अचानक आँख खुली तो
जी चाहा के स्विमींग पूल के ठंडे पानीमें एक डुबकी मारके आऊं
बाहर आके स्विमींग पूलपें देखा तो हैरान हुआ
जाने कबसे बिन पुंछे एक चांद आया और मेरे पुल पे लेटा था और तैर रहा था
उफ्फ कल रात बहुत गर्मी थी !

‘प्रचंड उकडतय’ या अतिशय कंटाळवाण्या गोष्टीला एवढ्या रोमँटिकपणे व्यक्त करता येवु शकतं हे मला गुलजारनेच शिकवलं.

किशोर कदम, अर्थात आपल्या लाडक्या सौमित्रने ‘एक स्वप्न पुन्हा पुन्हा’ च्या प्रस्तावनेत एक प्रसंग सांगितलाय.. बहुतेक न्यूयॉर्क मधला. नदी पार करण्यासाठी एकदा गुलजार साहेबांबरोबर नदीच्या काठावर थांबलो असताना पाण्याचा प्रवाह बघत सौमित्र यांनी, त्यांना एक प्रश्न केला,
”आपको तैरना आता है?”
गुलजार साहेबांनी शांतपणे उत्तर दिलं, ”नही, सिर्फ डूबना आता है…”

‘डुबणं, बुडून जाणं’ एवढं सुंदर असु शकतं, बुडण्याला असाही एक अप्रतिम अर्थ असु शकतं हे मला पहिल्यांदाच समजलं. कुठल्याही कामात झोकून स्वतःला पुर्णपणे देण्यातला आनंद काय असतो ते गुलजारसाहेबांनी शिकवलं.

रात का नशा अभी, आंखसें गया नहीं
तेरा नशीला बदन बाहोनें छोडा नहीं
ऑंखे तो खोली मगर, सपना वो तोडा नहीं
हा….वही, वो…वोही…
सांसो पें रख्खा हुआ तेरे होटोंका सपना अभी है वहीं.>…

शाहरुखचा ’अशोका’ आणि करीनाचं ते हॉट स्नानदृष्य आठवलं ना? पटकन विसरून जा. त्या ‘शाहरुख आणि करीना’ ऐवजी ‘घर’ची ‘विनोद मेहरा आणि रेखा’ किंवा ‘तराना’ मधली दिलीपसाब आणि मधुबालाची जोडी डोळ्यासमोर आणा आणि आता पुन्हा एकदा शेवटची ओळ गुणगुणून बघा…

“सांसो पें रख्खा हुआ तेरे होटोंका सपना अभी है वहीं…”

या ओळी नाही आपल्याश्या वाटल्या, स्वतःला क्षणभर का होइना विनोद किंवा दिलीपसाबच्या जागी ठेवुन नाही पाहीलं तर बोला….. पण खरी गंमत यात आहे की या ओळी करिना आणि शाहरुखला बघतानासुद्धा परक्या वाटत नाहीत, कारण त्या ऐकताना आपण पडद्यावर बघत नसतोच मुळी तर आपण त्या ओळी आपल्या आयुष्याशी रिलेट करुन बघत असतो. ही गुलजारसाहेबांच्या लेखणीची ताकद होती.

गुलजारसाहेबांनी बहुतेक सगळे रस आपल्या कवितेत आजमावले, पण प्रेमरस आपल्या कवितेत वापरताना त्यांच्या कवितेला काही वेगळेच धुमारे फुटायचे. नेहमीप्रमाणे, सर्वसाधारण प्रेमभावना त्यांच्या कवितेत कधीच सापडली नाही. वेगवेगळी प्रतिके, निरनिराळ्या उदाहरणांचा वापर करुन प्रेम आणि प्रेयसीबद्दलच्या भावना व्यक्त करणे हा गुलजारसाहेबांचा हातखंडा होता.

नज्म उलझी हुई है सीने में
मिसरे अटके हुए है होटों पर
उडते-फिरते है तितलीयोंकी की तरह
लफ्ज कागज पे बैठते है नही
कब से बैठा हूं मै जानम
सादे कागज पे लिखके नाम तेरा…

बस तेरा नाम ही मुकम्मल है
इससे बेहतर भी नज्म क्या होगी ?

आयुष्‍याच्‍या सुरुवातीची काही वर्षे एका गॅरेजमध्‍ये कार मेकॅनिक म्‍हणून काम करणारा ‘संपूरणसिंग काला’ हा तरुण चित्रसृष्‍टीत ‘गुलझार साहब’ या नावाने आदराने ओळखला जातो. हिंदीच नव्‍हे, उर्दु, पंजाबी आणि मारवाडी भाषेतही त्‍यांनी विपुल लेखन करून आपल्‍या वाचकांमध्‍ये मानाचे स्‍थान मिळविले आहेच. पण माझ्यापुरतं बोलायचं झालं तर या ‘गुलजार’ व्यसनाने माझं जगणं फारच सुसह्य करुन टाकलय, समृद्ध करुन टाकलय. कधी कधी असं वाटतं की ‘गुलजार’ हे संवेदनशीलतेचं दुसरं नाव असावं.

एक नज्म मेरी चोरी कर ली कल रात किसी ने
यही पडी थी बाल्कनी में
गोल तिपाही के उपर थी
व्हिस्की वाले ग्लास के नीचे रखी थी
नज्म के हल्के हल्के सिप मैं
घोल रहा था होटाँ में
शायद कोई फोन आया था
अन्दर जाके लौटा तो फिर नज्म वहां से गायब थी
अब्र के उपर नीचे देखी
सुट शफक की जेब टटोली
झांक के देखा पार उफक के
कही नजर ना आयी वो नज्म मुझे
आधी रात आवाज सुनी तो उठ के देखा
टांग पे टांग रख के आकाश में
चांद तरन्नुम में पढ पढ के
दुनिया भर को अपनी कह के
नज्म सुनाने बैठा था

आपल्या पुखराजच्या अर्पणपत्रिकेत गुलजारसाहेबांनी म्हटलय…

नज्मोंके लिफाफोंमे कुछ मेरे तजुर्बे है,
कुछ मेरी दुंवाए है,
निकलोगे सफरपे जब, ये साथ रख लेना,
शायद कही काम आए…

गुलजारसाहेब, तुमच्या लाडक्या बोस्कीचं किंवा इतरांचं मला माहीत नाही पण तुमचे हे तजुर्बे आणि आशीर्वाद मला माझ्या आयुष्यात नेहमीच मोलाची साथ करत आलेले आहेत.

***************************************************************************************************

समस्त मायबोलीकर आणि मीमराठीकर मित्रमंडळींनी नेहमीच माझ्या लेखनाचं मनापासून कौतुक केलय, भरभरून प्रोत्साहन दिलय. या अशाच काही प्रोत्साहक प्रतिक्रिया (माबो आणि मीमवरुन साभार )

मायबोलीवरुन…
ट्यागो | 5 May, 2013 – 21:00

‘दिल्से’ त्ल्या एकाही गाण्यावर नाय लिहलं आँ?
जाऊदे पण, तसंही मग बरंच वाढत जाईल एवढी मोठी यादी आहे.

स्वाती आंबोळे +१.

अशक्य रोमँटेक लिहतो हा माणूस.
त्यांच्याच आवाजात ऐकलेली त्यांची एक कविता-

“मुझको इतने से काम पे रख लो…
जब भी सीने पे झूलता लॉकेट
उल्टा हो जाए तो मैं हाथों से
सीधा करता रहूँ उसको
मुझको इतने से काम पे रख लो…

जब भी आवेज़ा उलझे बालों में
मुस्कुराके बस इतना सा कह दो
आह चुभता है ये अलग कर दो
मुझको इतने से काम पे रख लो….

जब ग़रारे में पाँव फँस जाए
या दुपट्टा किवाड़ में अटके
एक नज़र देख लो तो काफ़ी है
मुझको इतने से काम पे रख लो…

‘प्लीज़’ कह दो तो अच्छा है
लेकिन मुस्कुराने की शर्त पक्की है
मुस्कुराहट मुआवज़ा है मेरा
मुझको इतने से काम पे रख लो”

(http://kawyasagarwithneal.blogspot.in/2010/08/blog-post_3128.html इथून साभार..)

दक्षिणा | 6 May, 2013 – 09:42

लाजवाब लेख! असली व्यसनं आयुष्य वाढवतात.
गुलजार माझेही आवडते लेखक.
म्हणतात ना पाहणार्‍याला भिंती पलिकडचं दिसतं, न पाहणार्‍याला काचेपलिकडचंही दिसत नाही.
गुलजार हा माणूस भिंतीपलिकडचं पाहणारा, त्याहून जास्त ते योग्य आणि खूब शब्दात वाचकांपर्यंत पोचवून त्यांचा मनाचा ठाव घेणारा लेखक.

एक पुराना मौसम लौटा यादभरी पुरवाई भी
ऐसा तो कम ही होता है, वो भी हो तनहाई भी……

आगाऊ | 6 May, 2013 – 09:43

ज्जे बात! बहोतही बढीया, तालियां बजती रहनी चाहिए, बजतीही रहनी चाहिए!
अगदी प्रामाणिकपणे सांगतो, गेल्या कित्येक दिवसातला हा तुझा सर्वात सुंदर लेख आहे, आणि त्याचे क्रेडीट गुलजारचेच आहे.

 दीपाली | 6 May, 2013 – 16:24

विशू लेख अगदी भिजवणारा…

जमीन पर चलणारे तारे आणि यही रहणारा चांद, गुलजार साहेबांशिवाय कोणाला सुचणार?

ह्या दोन ऐकताक्षणीच माझ्या मनात कायमसाठी रहायला आलेल्या….
करवट
सिलवटों में ढूँढता हूँ, खाबों के शहर का नक्श
नींद के टुकड़े चुना करता हूँ,
रात भर पीठ में चुभती रहती है करवट!

तन्हाई के तकिये पे सर रख कर
यादों की पट्टी करता हूँ,
दिल में लेता है दर्द लेता है फिर करवट!

नमी दिखती है और बरसती है उमस
आसमान में जब जब बादल गुजरता है,
आँखों में जैसे ख्वाब कोई लेता है करवट!

आज चांदनी नहीं बरसी, सितारों की रात है
खाली जज्बात टिमटिमाते हैं,
आसमान में चाँद ने फिर बदली है करवट!

मैंने रौशनी पी ली है या जमीन हिलती है?
कि मेरा साया लडखडाता हैं,
जिस्म में मेरे, रूह ने लगता है फिर ली है करवट!

जेहन के फर्श पर जाने कब से लेटी पड़ी थी
अब जाग गयी नज्म,
डायरी के सफहों ने फिर बदली करवट!!

उपले
छोटे थे, माँ उपले थापा करती थी
हम उपलों पर शक्लें गूंथा करते थे
आँख लगाकर, कान बनाकर
नाक सजा कर
पगड़ी वाला, टोपी वाला
मेरा उपला
तेरा उपला
अपने अपने जाने पहचाने नामों से
उपले थापा करते थे
हँसता खेलता सूरज रोज़ सवेरे आकर
गोबर के उपलों पर खेला करता था
मेरा उपला सूख गया
उसका उपला टूट गया
रात को आंगन में जब चूल्हा जलता था
हम सारे चूल्हा घेर कर बैठे रहते थे
किस उपले की बारी आई
किसका उपला राख हुआ
वह पंडित था
वह मास्टर था
इक मुन्ना था
इक दशरथ था
बरसों बाद
श्मशान में बैठा सोच रहा हूँ
आज की रात इस वक़्त के जलते चूल्हे में
इक दोस्त का उपला और गया!

अनिलभाई | 6 May, 2013 – 17:26

बहोत बढीया विशाल. हे व्यसन कोणाला नसेल. स्मित

और एक..

मुझको भी तरकीब सिखा मेरे यार जुलाहे
अक्सर तुझको देखा है के ताना बुनते बुनते
जब कोई तागा टुट गया या खत्म हुआ
फिर से बाँधके
और सिरा कोई जोड के उसमे
आगे बुनने लगते हो
तेरे इस ताने में लेकिन
एक भी गाँठ गिराह बुनतर की
देख नही सकता कोई

मैने तो एक बार बुना था एक ही रिश्ता
लेकीन उसकी सारी गिराहे
साफ नजर आती है मेरे यार जुलाहे
मुझको भी तरकीब सिखा मेरे यार जुलाहे
– गुलजार

आगाऊ | 6 May, 2013 – 17:44

अरे व्वा, इथे तर सुंदर मैफलच जमली आहे!
”आओ फिर नज्म कहें,
फिर किसी दर्द को सहला के सुजा ले आंखें,
फिर किसी दुखती रग से छुआ दे नश्तर,
या किसी भूली हुई राह पे मुडकर, एक बार नाम लेकर
किसी हमनाम को आवाज ही दे ले,
आओ फिर नज्म कहें”

रात भर सर्द हवा चलती रही
रात भर हमने अलाव तापा
मैंने माज़ी से कई खुश्क सी शाखें काटी
तुमने भी गुजरे हुए लमहों के पत्ते तोड़े
मैंने जेबों से निकाली सभी सूखी नज़्में
तुमने भी हाथों से मुरझाए हुए ख़त खोले
अपनी इन आँखों से मैंने कई मांजे तोड़े
और हाथों से कई बासी लकीरें फेंकी
तुमने भी पलकों पे नमी सूख गई थी, सो गिरा दी
रात भर जो भी मिला उगते बदन पर हमको
काट के डाल दिया जलते अलावों में उसे
रात भर फूकों से हर लौ को जगाए रखा
और दो जिस्मों के ईंधन को जलाए रखा

रात भर बुझते हुए रिश्ते को तापा हमने..

(प्रताधिकार पोलीस येतील लवकरच इथे. पण तोवर मजा आली री-व्हिजिट करायला हे कलेक्शन.)

 सुनिधी | 7 May, 2013 – 01:01

मस्त!! गुलजार चीजच अशी आहे.
(म्हणतात की, आरडी बर्मन ह्यांनी ‘मेरा कुछ सामान’ पहिल्यांदा वाचले तेव्हा ‘ह्याला काय चाल लावु’ ह्या विचाराने त्यांना चक्कर आली ( अर्थातच शब्दशः नव्हे). मग ते आव्हान पेलत पुढे आशाच्या आवाजात त्या अजरामर गाण्याचा जन्म झाला. आता असं वाटतय की त्यांच्या सर्वच गीतांना वाचुन संगीतकाराला असच होत असेल पहिल्यांदा..

दाद | 7 May, 2013 – 05:23

मॅड… लेख अन त्यावर जमलेली मैफिलही.
अतिशय सुंदर जमलाय लेख, विशाल.

मीमराठीवरून….

{अप्रतिम}

अशोक पाटील यांनी शुक्र, 31/08/2012 – 13:32 ह्यावेळी प्रकाशित केले.

विशाल…

वर आतिवासताईनी म्हटल्याप्रमाणे मीदेखील ‘वाईट्ट’ विशेषण योजनेच्या उपयुक्ततेविषयी साशंक आहे…’व्यसन’ चालेल… ‘वाईट’ला अशी काहीएक ब्लॅक टिन्ट आहे की जी वैयक्तिक तसेच समाजस्वाथ्यासाठी सुटणे गरजेचे होऊन बसते. पण ‘गुलझार’ हे व्यसन तर कधीच सुटू नये असेच मी म्हणेन….[बाकी गुलझारच नव्हे तर त्या पंक्तीतील कुणाचेही]. असो.

मी स्वतः ‘मोरा गोरा अंग लै ले….’ बन्दिनीतील त्यांच्या पहिल्यावहिल्या गीतापासून गुलझार जादूशी परिचित आहे. या गाण्यातील ‘…तोहे राहू लागे बैरी मुस्काये जी जलाईके…’ या ओळीवर तर लट्टू होती त्या काळातील कॉलेजकुमार जनता. चंद्राला राहूने खावे असे त्या तरुणीने का म्हणावे? याचा मागोवा घेण्यात त्या काळातील युवा मग्न होता. पुढे मग ‘आनंद’ च्या ‘मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने….’ पासून गुलझार गीतांनी हृदयात जे घर केले त्याची काळाच्या ओघात एक वीटही ढासळली गेलेली नाही.

‘मौसम’ च्या ‘दिल ढुंढता है….फिर वही फुरसद के रातदिन…’ यामध्ये तर नैराश्येने काळवंडून जरी गेले असले तरी ते जीवन जगण्याच्या अटळतेविषयी गुलझार सांगतात… जे दोनचार क्षण खर्‍याखुर्‍या विश्रामाचे…त्याचा अथक शोध. मानवी ललाटी असलेल्या भोगातून बाहेर पडून भूतकाळातील अल्पसे सौख्य हीच काय ती मिळकत…! गुलझार यांची लेखणी इथे दुखावत नाही, तर दुखर्‍या भागाला मलमपट्टी करते.

खूप खूप लिहिण्यासारखे आहे गुलझार या विषयावर.

फार सुंदर अनुभव आहे अशा मनस्वी कविच्या वाटचालीचा विशालने घेतलेला मागोवा.

[शक्य झाल्यास ‘काला’ ऐवजी काल्रा – Kalra – अशी दुरुस्ती करावी. काल्रा ही अरोरा या शिख फॅमिली ट्री मधील एक उपजात असून काश्मिरमध्ये तिच्या शाखा आहेत….गुलझार त्या घराण्यातील म्हणून संपूर्णसिंग काल्रा]

अशोक पाटील

विशाल कुलकर्णी यांनी शुक्र, 31/08/2012 – 17:24 ह्यावेळी प्रकाशित केले.

धन्यवाद काका ! बदल केला आहे हास्य

‘मोरा गोरा रंग लै ले’ वरुन मागे जालावर कुठेतरी वाचलेली या गाण्याची जन्मकथा आठवली. आईवडीलांना वाटले होतो, मुलगा सी ए होईल. पण कसचे काय…हा दिल्लीहून मुंबईस आला. सेल्समनची नोकरी घेतली. त्यात दोनशे रुपये पगार मिळायचा. त्यातीलही ६० रुपये कापले जायचे…पण त्या नोकरीत वाचायला मिळायचे नाही म्हणून ती सोडून १५० रुपयांची नोकरी विचारे मोटर गॅरेज मधे स्विकारली. वाचायला वेळ मिळालाच पण तेथे स्वतःच्या गाड्या दुरूस्त करायला येणारे बासू भट्टाचार्य, देबुसेन आदी ओळखीचे झाले.

त्याच वेळेस बिमलदा “बंदीनी” चित्रपट काढत होते. शैलेंद्र आणि बिमलदांमधे तेंव्हा मतभेद झाले होते. म्हणून बासू भट्टाचार्यांनी या रिपेअरमनला बिमलदा आणि सचीनदेवना भेटायला आणले. त्यात कल्याणी (नुतन) तीचे विकास (अशोक कुमार) वरील मूक प्रेम दाखवताना रात्री गाणे म्हणते असे दाखवायचे होते. पण बिमलदांची अट अशी की मुलगी एकटी रात्री अंगणात जाऊन अथवा वडीलांसमोर कवीता म्हणणार नाही. सचीनदेवांचे म्हणणे मग गाणे घरात गुदमरून जाईल त्यामुळे मी संगीत देणार नाही. ती कविता ही ती तिच्या वडीलांकडून ऐकत असलेल्या वैष्णवी कवितेसारखी होती… (हे सर्व बिमलदा, सचीनदांचे विचार) … हे सर्व गुलजारना समजावून सांगितले. मग काही शब्द बसवले ते चंद्राशी ती बोलते असे होते. पण तितकेसे रुचले नाहीत.

मग आरडींनी त्यालाच ढोबळ चाल लावून दिली.त्याला सचीनदांनी “पॉलीश” केले.मग या कविच्या मनात आले की ही कल्याणी म्हणते आहे की, “मी काळीसावळी असते तर रात्रीत प्रियकराजवळ निघून गेले असते…” आणि मग त्यांना खालील ओळी सुचल्या

मोरा गोरा रंग लई ले
मोहे शाम रंग दई दे….

ह्या गाण्यामुळे त्या कल्याणीला अथवा तीचे काम करणार्‍या नुतनला कुठला रंग मिळाला ते माहीत नाही पण हिंदी चित्रपटसृष्टीस “मेलडी” म्हणता येतील अशी अनेक गाणी मिळतच राहीली आणि अजूनही तशी मिळत राहोत हीच इच्छा!

(आंतरजालावरून साभार)

मोरा गोरा रंग’ ह्या एकाच गाण्याविषयीसुद्धा खूप काही लिहिण्यासारखे आहे. सचिनदांचे र्‍हीदम अरेंजर मारूतराव कीरांनी असा काही ऑफबीट ठेका धरला आहे की पटकन कुठे सम येते तेच कळत नाही. शिवाय इंटरल्यूडमध्ये परत ठेका बदललाय, डग्गा मस्त घुमवलाय. खरं म्हटलं तर तबला, मेंडोलिन, खोपडी-तरंग आणि ग्रूप व्हायोलिनचा अतिशय सुबक आणि सरल मेळ आहे.. पण त्यातही खुबी केल्या आहेत. लताबाईंचा विलक्षण दैवी आवाज आणि गुलझारसाहेबांचे अतिशय अर्थपूर्ण शब्द हे तर वेडच लावतात. त्यात बिमलदांचे दिग्दर्शन आणि नूतनचा अभिनय.. एकावर एक कडी किती असावी याला काही मर्यादाच नाहीत..!!

 

अभिजितमोहोळकर यांनी शुक्र, 31/08/2012 – 17:03 ह्यावेळी प्रकाशित केले.

गुलजार हे एक मिस्टर आहेत. त्यांच्या गीतातून, कवितांतून आणि त्यांनी निर्मिलेल्या चित्रपटातून हे सतत जाणवत रहातं. हॄषीदांच्या अनेक चित्रपटातील संवाद गुलजार ह्यांचे आहेत ह्यात बरंच काही आलं.


रमताराम यांनी शुक्र, 31/08/2012 – 21:44 ह्यावेळी प्रकाशित केले.

खतरणाक लेख.

एकदम वरिष्ठ. सालं असल्या व्यसनाधीन माणसांचं जगणं म्हणजे खरं जगणं. नायतर भेंडी पुल म्हणतात तसं ‘सकाळी फोडणीच्या भाताबरोबर साधं वरण नि संध्याकाळी साध्या भाताबरोबर फोडणीचं वरण खात कवडी कवडी करत पैसा जोडायचा नि उतारवयात कुठेतरी गावाबाहेर ‘श्रमसाफल्य’ किंवा ‘कृतार्थ’ वा तत्सम नावाचा चार खोल्यांचा बंगला बांधायचा नि म्हणायचं ‘काय जगलो नाय आपण’. जगणं नि जिवंत राहणं यातला फरक अधोरेखित करतात ती अशी व्यसनं.

(व्यसनाधीन, वाईट्ट, बेक्कार, वरिष्ठ* वगैरे) रमताराम

ता.क. मामाजी ‘वाईट्ट’ या शब्दाची नेमकी छटा, नेमकं कनोटेशन समजण्यासाठी कालेजातले दिवस आठवा. हास्य त्यावेळची शब्दसंपदा पेटीतून बाहेर काढा म्हणजे विशालला नेमका तोच शब्द का सापडला लक्षात येईल. आपण तर ‘बेक्कार’ फिदा आहोत या शब्दावर.


अशोक पाटील यांनी शुक्र, 31/08/2012 – 22:51 ह्यावेळी प्रकाशित केले.

“‘वाईट्ट’ या शब्दाची नेमकी छटा, नेमकं कनोटेशन समजण्यासाठी कालेजातले दिवस आठवा…..”

~ वेल वेल वेल….आय वंडर व्हेदर यू कॉट मी नॅपिंग, डॉक !

कोल्हापूरच्या गोखले कॉलेजमधील इंग्रजी स्पेशलची शारदा वणकुद्रे ‘वाईट्ट सुंदर होती’ … एनसीसी ऑफिसर सुलोचना खानविलकर वाईट्ट मारू दिसायची लेफ्टनंटच्या ड्रेसमध्ये….प्रज्ञा इंग्लिश क्लासमधील शबनम मुजावर वाईट्ट रितीने सरांच्या प्रश्नांना अर्जुनाच्या बाणाप्रमाणे सटासट उत्तरे देत असे…’कम सप्टेम्बर’ मधील जिना लोलोब्रिगिडा इतकी वाईट्ट हसायची की ते पाहून आम्ही रात्रभर मेस्त्रीच्या गॅरेजमध्ये पडून ‘कुण्या भाग्यवंताचा असेल हा ठेवा..!’ ही रेकॉर्ड गुणगुणत पडून राहात असू.

[…चलो या निमित्ताने….’पडेन पण पडून राहाणार नाही…’ खास जी.ए. टच आठवला.]

विशाल कुल्कर्णी

 

12 responses to “माझी ’वाईट्ट’ व्यसनं : भाग १

 1. अभिषेक

  ऑगस्ट 27, 2012 at 5:10 pm

  वाह, रे व्यसन!

   
 2. देवदत्त

  ऑगस्ट 27, 2012 at 5:17 pm

  मस्त विवेचन.

  जाता जाता…
  ह्याच गुलजार साहेबांनी ‘जंगल बुक’ चे ‘ जंगल जंगल बात चली है, पता चला है… ” आणि ‘सत्या’ चे ‘गोली मार भेजे में’ अशी एकदम वेगळ्या धाटणीची गाणीही लिहिलीत 🙂

   
  • विशाल कुलकर्णी

   ऑगस्ट 28, 2012 at 3:14 pm

   अगदी, अगदी देवदत्त ! मला वाटतं इतक्या विविध प्रकारचं लेखन करणारे गुलजारसाहेबांसारखे प्रतिभावंत विरळाच असतील. धन्यवाद !

    
 3. shradha kulkarni

  ऑगस्ट 28, 2012 at 10:01 सकाळी

  आईशप्पथ, कसलं खतरनाक लिहितात हे गुलझार…. पहिली कविता तर केवळ अप्रतिम….
  जियो…. काही लिंक्स असतील तर फोरवर्ड कर नं प्लीज..

   
  • विशाल कुलकर्णी

   ऑगस्ट 28, 2012 at 3:15 pm

   मन:पूर्वक आभार श्रद्धा !
   आंतरजालावर शोधावे लागेल. गुलजारसाहेबांच्या लेखनासाठी आंतरजालाचा आधार घेण्याची अजुन तरी फ़ारशी गरज नाही पडली कधी. पण मी शोधतो आणि सांगतो 🙂

    
 4. Tanvi

  ऑगस्ट 29, 2012 at 6:37 pm

  __/\__ ..
  व्यसनी माणूस … भाग २ लवकर लिही… 🙂

   
 5. Shantisudha

  ऑगस्ट 29, 2012 at 9:03 pm

  मलाही गुलजारांचं लेखन खूप आवडतं. विशेषत: गझल्स. मस्त लिहीलं आहेस.

   
  • विशाल कुलकर्णी

   ऑगस्ट 30, 2012 at 9:47 सकाळी

   ताई, गझल्स तर आवडतातच त्यांच्या, पण गुलझार खुलतात ते मुक्तछंदातच ! धन्यवाद 🙂

    
 6. ruchira2702

  सप्टेंबर 1, 2012 at 10:51 pm

  सुंदर लिहिलत.. बाकी गुलजार ह्या शब्दातच आलं नं सगळं…

   
  • विशाल कुलकर्णी

   सप्टेंबर 3, 2012 at 12:37 pm

   धन्यवाद रुचिरा ! आयुष्यभर टिकावं असं वाटणारी जी फ़ार थोडी व्यसनं आहेत, त्यात खुप वरचा नंबर आहे गुलझारसाहेबांचा 🙂

    

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: