RSS

मी मराठी लेखन स्पर्धा २०१२ चा निकाल

29 मार्च

सर्व वाचकश्रेष्ठींना नमस्कार,

मी मराठी नेटवर यावर्षी घेतल्या गेलेल्या लेखन स्पर्धेचा निकाल आज जाहीर झालेला आहे. त्यासंदर्भातील मी मराठीचे चालक – मालक श्री. राज जैन यांनी दिलेली बातेमी खालीलप्रमाणे……

*******************************************************************************************************

नमस्कार

मी मराठी लेखन स्पर्धा २०१२ चा निकाल आज जाहीर करत आहोत यांचा आम्हाला खूप आनंद होत आहे. काही व्यक्तीगत कारणामुळे निकाल जाहीर होण्यास वेळ लागला याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

१-१२-२०१० ते ३१-१२-२०१० याकाळात मी मराठी.नेटने लेखन स्पर्धा २०१० आयोजित केली होती, तसेच मी मराठीवर काव्य स्पर्धा २०११ यशस्वीपणे राबवण्यात आली होती. तो सर्व पूर्वानुभव सोबत घेऊन मी मराठी.नेट तर्फे लेखन स्पर्धा २०१२ घेतली होती. स्पर्धेच्या प्रतिसादाबाबत आम्हाला ज्या अपेक्षा होत्या त्या पुर्ण झाल्याच. उत्तम लेखकांनी मनापासून स्पर्धेत सहभाग घेतला व आपल्या प्रवेशिका वेळेवर मी मराठीवर प्रकाशित केल्या. सर्व स्पर्धकांनी पाठवलेल्या लेखनाचे योग्य प्रकारे मुल्यमापन करणे आणि वस्तुनिष्ठ निर्णय घेऊन निकाल देणे ही परीक्षक श्री. श्रीकांत बोजेवार यांच्यासाठी कसोटीच होती. परीक्षक श्री. श्रीकांत बोजेवार यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या कार्यालयीन व्यापांमधुन, साहित्यसेवेतुन तसेच घरगुती जीवनातून त्यांचा बहुमुल्य वेळ काढून सर्व प्रवेशिका वाचल्या याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. निकाल जाहीर करण्याआधी त्यांना हवा तेवढा वेळ लेखन वाचण्यासाठी देण्याचा निर्णय आधीच झालेला होता. त्यानुसार त्यांनी आज निकाल मीमराठी.नेट पर्यंत पोहचवला आहे, तो आम्ही तुमच्या समोर जाहीर करत आहोत. सर्व स्पर्धकांचे, सदस्यांचे, वाचकांचे सर्वांचे अगदी मनःपूर्वक आभार व मी मराठी बरोबर असलेला तुमचा स्नेह असाच कायमस्वरूपी राहो ही तुमच्या चरणी प्रार्थना. तुमचा पाठिंबा आणि सहकार्य लाभल्यामुळेच मी मराठी.नेटची सातत्याने प्रगती होत आहे. तुमच्या सहयोगाच्या जीवावर मी मराठी परिवार अनेक नवनवीन योजना सातत्याने राबवत राहील. आज लेखन स्पर्धा २०१२ चे निकाल जाहीर करत असताना विजेत्यांचे तर अभिनंदन आहेच पण सर्व स्पर्धक आणि मी मराठी परिवारातील सर्वांचे अभिनंदन! मी मराठी परिवारावरील आपणा सर्वांचा विश्वास व स्नेह असाच वाढत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

लेखन स्पर्धा २०१२ निकाल

प्रथम तीन विजेते
प्रथम क्रमांक – आशिष निंबाळकर ( चक्रावळ )
द्वितीय क्रमांक – विशाल कुलकर्णी (चिकणी चमेली )
तृतीय क्रमांक – नीलपक्षी ( कोंबडीला मालक पाहिजेच…)

बक्षिस समारंभ व बक्षिस वितरणाची सुचना सर्वांना लवकरच दिली जाईल व त्यांचा वेगळा धागा असेल. पुन्हा एकदा सर्वांचे अनेकानेक आभार. पुढील लेखनाकरता अनेकानेक मी मराठी.नेटतर्फे सर्वांना शुभेच्छा.
सर्वांचा असाच लोभ रहावा ही विनंती.

आपलेच,

मी मराठी.नेट

***************************************************************************************************************

चिकणी चमेली ’मी मराठी नेट’ वर

सर्व विजेत्यांचे (माझ्यासहीत) आणि सहभागी सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन !

श्री. राज जैन, संचालक, मी मराठी नेट आणि स्पर्धेचे परीक्षक श्री. श्रीकांत बोजेवार (उर्फ़ श्री. तंबी दुराई) यांचे मन:पूर्वक आभार 🙂

सस्नेह,

विशाल कुलकर्णी

 

16 responses to “मी मराठी लेखन स्पर्धा २०१२ चा निकाल

 1. सुहास

  मार्च 29, 2012 at 4:13 pm

  सहीच… खूप खूप अभिनंदन विशालभौ. कथा उत्तम झाली होती यात शंका नाही. 🙂 🙂

  भेटूच बक्षीस समारंभात 😀

   
  • विशाल कुलकर्णी

   मार्च 29, 2012 at 4:16 pm

   मन:पूर्वक आभार बंधू 🙂
   बादवे आपल्या त्या नव्या प्रोजेक्टचे काय झाले? 😉

    
   • सुहास

    मार्च 29, 2012 at 4:20 pm

    कसल्या रे? कुठला प्रोजेक्ट?

     
 2. anuvina

  मार्च 29, 2012 at 4:29 pm

  आशिष निंबाळकर, विवेक कुलकर्णी आणि निलपक्षी यांचे अभिनंदन.

   
 3. सिद्धार्थ

  मार्च 29, 2012 at 5:53 pm

  अभिनंदन विशालभौ…

  जोरदार पार्टी होऊन जाऊ द्या राव…

   
 4. स्वागता

  मार्च 30, 2012 at 6:00 सकाळी

  abhinandan….!

   
 5. Veedee (@Veedeeda)

  एप्रिल 2, 2012 at 12:39 सकाळी

  मनः पूर्वक अभिनंदन !

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: