RSS

रॉंग नंबर : भाग ५

22 डिसेंबर

रॉंग नंबर : मागील कथानक

तीने फार मोठी घोडचुक केली होती. अर्थात चुक टकल्याची होती, चैतन्यबद्दलची सगळी माहिती तिला द्यायला हवी होती. पण चैतन्य अविवाहीत आहे हे तिला माहीत नव्हते आणि फोनवर पलिकडच्या बाजुला मुंबई पोलीसांचा एक अतिशय धुर्त आणि चाणाक्ष पोलीस अधिकारी आहे याचा तिला संशय येणेही शक्य नव्हते. चैतन्यचा फोन चालु ठेवणे ही टकल्याची मोठी चुक होती. तीची फळे पख्तुनीला भोगावी लागणार होती.

आता पुढे…

*****************************************************************************

“शिर्‍या, हा मोमीन म्हणजे तो तीन बत्तीवालाच ना रे?”

रावराणेंच्या स्वरातली नाराजी शिर्‍याच्या लगेच लक्षात आली.

“सतीश तुझा अंदाज अगदी बरोबर आहे, हा तोच. आता माझ्याशी त्याचा काय संबंध हे विचारू नकोस?”

“नाही मी तसे विचारणार नाहीच आहे. मी विचारतोय मोमीनसारख्या ड्रग डिलरशी तुझा कसा काय संबंध?”

“सतीश, माझे काँटॅक्ट्स मलेशियातही आहेत. माझं क्षेत्रच असं आहे की सगळ्या प्रकारच्या लोकांशी संबंध येतात माझे. इथे कुणाला दुखावून चालत नाही. आणि कुठल्या मर्यादेपर्यंत आपले संबंध ठेवायचे ते शेवटी आपल्यावरच डिपेंड असते ना रे. मोमीनचे म्हणशील तर त्याला डी गँगच्या तावडीतून वाचवले होते एकदा. तू बघीतले असशील गेल्या कित्येक दिवसात मोमीनच्या अजिबात हालचाली दिसत नाहीत.”

“हो, डिपार्टमेंटने तर तो दुबईला पळाला असे जाहीर करून टाकलेय.”

“ते ऑफिशियली, अनऑफिशियली तुमच्या डिपार्टमेंटचे लोक अजुनही मोमीनकडून त्यांचा वाटा उचलतातच की. हवे असल्यास काही जणांची नावे सांगू तुला?”

“सोड, मला माहीत आहेत सगळे. सद्ध्या ते महत्त्वाचे नाहीये. मोमीनला उचलायचे आहेच मला, पण सद्ध्या या केसमध्ये त्याची मदत होणार असेल तर राहू दे अजुन काही दिवस बाहेर त्याला. त्याला कधीही उचलु शकतो मी. पण सद्ध्या त्याची सगळी डिलींग्स बंद असल्याने फक्त नजर ठेवून आहे. नंतर बघेन त्याच्याकडे. अर्थात त्यावेळी तो तुझा मित्र आहे हे मी सोयिस्कर पणे विसरून जाईन.”

“आय डोंट माईंड. पक्का पोलीसवाला आहेस साल्या तू. आणि माझा तरी कुठे सख्खा आहे तो. आपले काम झाले की उचल त्याला. मीही मदत करेन हवी तर.”

शिर्‍याने डोळे मिचकावले तसा सत्या हसायला लागला.

“साल्या तू ना…..

“एक नंबरचा मतलबी आहेस.” शिर्‍याने त्याचे वाक्य पुर्ण केले आणि खदखदून हसायला लागला.

गाडी एका साईडला घेत शिर्‍याने उभी केली.

“इथे कुठे थांबतो आहेस आता मध्येच?”

“सत्या, ती समोरची लेन दिसते ना ती ओलांडली की आपण ‘जयप्रकाश नगरच्या’ मागच्या बाजुला येतो. मी मोमीनला फोन करतो.”

शिर्‍याने मोमीनला फोन करून त्याच्या माणसाला त्यांच्या बाजुला पाठवायला सांगितले. तर मोमीन स्वतःच येतो म्हणाला.

जयप्रकाश नगर झोपडपट्टी ! मलबार हिल, वाळकेश्वरच्या देखण्या आणि श्रीमंत परिसराला लागलेला डागच जणू. इथुन दररोज लाखो रुपयाच्या गावठी दारुची उलाढाल होते. हा मोमीनचा इलाका होता. मोमीन इथला भाई होता. शिर्‍या आणि सतीशला पाचच मिनीट वाट पाहावी लागली असेल, तेवढ्यात मोमीन आलाच. सतीशला बघीतल्यावर मात्र तो चपापला. इन्स्पे. रावराणे हे नाव अंडरवर्ल्डमध्ये दया नाईकच्या नावाइतकेच कुख्यात होते.

“सलाम रावराणे साब. हमारी खुशकिस्मती जो आप हमारे गरीबखानेमें पधारे.”

मोमीनने चापलुसी करायचा प्रयत्न केला.

“जरुरत पडनेपर गधेकोभी बाप बनाना पडता है मोमीनमिया!”

“साब, अपनने ड्रगके सारे धंदे बंद कर दिये है! पुछलो शिर्‍याभायसे चाहे तो. आजकाल अपन शरिफ बन गया है!”

“तेरे लिये यही अच्छा है मोमीन, वर्ना मेरी गोलीयोंमे किसी एक पर तेराभी नाम लिखा हुवा है!”

“हॅ हॅ हॅ…..” चापलुसी करत मोमीन शिर्‍याकडे वळला.

“शिर्‍याभाई, उस चिकनेको कहा रख्खा है. मै बताता हूं तुमको. लेकीन ये कोई बडा लोचा लगता है भाय. वो बंदे टकला युसुफकें है! युसुफकी वो लौंडीया रजियाभी वही है!वैसे चिकना ऐ कौन भाय. लगता है कोइ बडी हस्ती है, उसके लिये खुद आप और रावराणेसाब आये है बोले तो……!”

“अपने कामसें काम रख मोमीन. ” शिर्‍याने त्याला फटकारले

“सतीश, बहुदा त्या रजियानेच फोन उचलला असेल मघाशी.”

“ह्म्म्म्म!” रावराणेंनी आपले रिवॉल्व्हर एकदा चेक करुन घेतले.

“मोमीन, इतनाही समझलें की वो चिकना अपने रावराणेसाहब का जिगरी दोस्त है और उसको बचाना है….!”

“अरे जान लगा देंगे ना भाय अपन, तुम बोलो तो अभी अपने आदमीयोंको भेज के उठवाता हूं उसको वहासे” इति मोमीन

“नाही, इतकी माणसं बघून कदाचित ते गुंड त्याला संपवायचा प्रयत्न करतील. शिर्‍या, आपल्यालाच जावे लागेल फक्त.”

“बस क्या बॉस, ये मोमीन कब काम आयेगा फीर. मेरे आदमी ना सही मै तो अकेला आ सकता हूं ना तुम्हारे साथ. वैसे भी ये जिंदगी शिर्‍याभाईकी देन है, ये उसके काम जाये और क्या चाहीये!”

शिर्‍याने सतीशकडे रोखुन पाहीले, सतीशने नजरेनेच होकार दिला.

“ठिक है मोमीन, चलो !”

मोमीन दोघांना घेवून झोपडपट्टीत घुसला. तो तिथला माहीतगार असल्याने तो पुढे व हे दोघे त्याच्या मागे होते. मोमीनने लांबुनच एक झोपडी दाखवली.

“वो देखो साब, वो खोलीमें बंद है उनो!”

ती झोपडी तशी जयप्रकाशनगरच्या एका बाजुलाच होती. झोपडीच्या आजुबाजुची वस्तीही विरळ होती. झोपडीपाशी बाहेर दोन माणसे खुर्च्या टाकून कॅरम खेळत बसली होती. पण कॅरम हा केवळ दिखावा आहे हे त्यांच्या दिसण्यावरुनच लक्षात येत होते. शिर्‍याने आजुबाजुला नजर मारली.

“सत्या, तिकडे अजुन दोन माणसे आहेत. आपला संबंध नसल्यासारखे दाखवताहेत पण ती नक्कीच झोपडीवर नजर ठेवून आहेत.”

“शिर्‍या, मी त्या दोघांकडे बघतो. मोमीन तू पुढे हो, त्या झोपडीसमोरच्या माणसाला बोलण्यात गुंतव. शिर्‍या तू त्या दोघांना सांभाळु शकशील ना?”

शिर्‍या नुसताच हसला.

“फक्त बेशुद्ध कर, जिवंत हवेत ते मला.”

“ओक्के बॉस !”

सतीश त्या इतर दोघांकडे वळला आणि मोमीनने झोपडीकडे मोहरा वळवला. झोपडीकडे त्याला येताना पाहून ते दोघेही सावध झाले. पण इथे मोमीनला विरोध करणे म्हणजे मृत्युशी गाठ हे जाणुन होते ते.

“क्या चल रहा है भाईलोग? बडे भाईने किसको उठाया है आज?”

मोमीनने सरळच मुद्द्याला हात घातला. शिर्‍या अजुन मागेच लपलेला होता. ते दोघे एकमेकाकडे पाहायला लागले.

“मोमीनभाई, ये तो हमकोभी पता नही. आम्ही छोटी माणसं भाई. पहारा द्यायला सांगितला आम्ही पहारा देतोय.” एकजण सहज बोलला पण बोलता बोलता त्याने आपला एक हात खिशात घातला होता.

“अरे यार जेबमेंही रहने दो अपना हाथ. बडेभाईके खेलमें हाथ डालकर अपनेको अपनी जिंदगीसे हाथ नही धोना है! वैसे कब तक रखना है बंदे को यहा तक? मेरे को थोडा आयडीया देके रखो, तो मै बाप लोगोंको इधर आनेसे रोकनेका कोशिश करेगा.”

आतापर्यंत त्या दोघांची मोमीनच्या निरुपद्रवीपणाबद्दल खात्री पटली होती. ते बोलण्यात गुंतले. तेवढा वेळ शिर्‍याला पुरेसा होता. नंतर काय झाले ते मोमीनलाही नीट कळाले नाही. त्याने फक्त शिर्‍याला वेगात त्यांच्याकडे झपाटताना पाहीले. एका हाताने एका गुंडाचा हात पिरगाळत शिर्‍याने दुसर्‍याच्या तोंडावर किक मारली होती. काही कळायच्या आत एकजण बेशुद्ध होवून पडला होता, दुसरा व्हायच्या मार्गावर होता.

“मोमीन, तू इथे लक्ष ठेव मी आत घुसतोय. आत अजुन माणसे असण्याची शक्यता आहे.”

शिर्‍याने तिथलीच ते गुंड बसले होते त्यापैकीच एक फोल्डींगची खुर्ची उजव्या हाताने उचलत डाव्या हाताने दारावर नॉक केले.

“कौन?”

आतुन आवाज आला तसे शिर्‍याने मोमीनकडे पाहीले. मोमीनने अजुन अर्धवट शुद्धीत असलेल्या त्या गुंडाची मान पकडली आणि त्याला खुणावले. त्याला काय हवे आहे ते ओळखुन त्या गुंडाने आवाज दिला.”

“रजियापा, मै शकील!”

“अपना काम कर ना, दरवाजा क्युं खटखटा रहा है?”

“आपा बडे भाईका फोन है आपके लिये. आपका फोन नही लग रहा था करके मेरे फोनपें रिंग किये उनो!”

“ठिक है, खोल रही हूं…

शिर्‍याने हातातल्या खुर्चीवरची पकड घट्ट केली. दरवाजा किंचीत किलकिला होत उघडला, एक स्त्री बाहेर डोकावली. समोरचे दृष्य दिसताच तिने पुन्हा दार बंद करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत शिर्‍याने पाय मध्ये घालुन दार उघडले व जोराचा धक्का देवून तो आत शिरला. हातातली खुर्ची त्याने हत्यारासारखी उचलुन धरली होती.

पण आत शिरताच समोर जे दृष्य दिसले ते बघून तो थंडच पडला.

******************************************************************************************************************************************

“चिटणीस, यावेळी बहुदा पख्तुनीने आघाडी घेतलेली दिसतेय. सकाळपासून चैतन्य गायब आहे. त्याचा काहीच पत्ता लागत नाहीये. फ़ोनही उचलत नाहीये तो.”

ब्रिगेडीयर चक्रवर्ती खुप चिंताग्रस्त दिसत होते. चैतन्य अशा पद्धतीन गायब होणे त्यांना नवीन नव्हते. यापुर्वीही अशा घटना खुप वेळा घडल्या होत्या. पण चैतन्यच्या सर्व क्षमतांची खात्री असुनही प्रत्येक वेळी ते असेच काळजीत पडत. चैतन्यला ते आपला मुलगाच मानत. पण या वेळी समोर पख्तुनी होता त्यामुळे काळजी जास्तच होती.

“चक्रवर्ती, मी तुला आधीच म्हणालो होतो. वेळ फ़ार कमी आहे. अजुनही सांगतो. मला जरा मोकळा सोड. मी एकटा सापडणे हे त्यांच्यासाठी खुप मोठे आमिश असेल हे लक्षात ठेव.”

“चिटणीस, यार तुझ्या लक्षात कसे येत नाहीये. पारडे फ़िरलेय आता. का कुणास ठाऊक पण मला माझे अंतर्मन सांगतेय की चैतन्य त्यांच्या तावडीत सापडलाय. तुला मोकळं सोडल्यावर तुझ्यावर चैतन्य लक्ष ठेवेल अशी आपली योजना होती. तशी मी त्याला कल्पनाही दिली होती. तो सकाळीच आपल्याकडे यायला निघालाही होता. पण त्यानंतर काहीच पत्ता लागत नाहीये. त्याच्या गाडीला मध्येच कुठेतरी अपघात झाला आणि एक काळ्या रंगाच्या स्विफ़्ट गाडीतून काही लोक त्याला हॉस्पिटलमध्ये घेवुन गेले एवढीच बातमी हाती आली आहे. ती गाडी नंतर वरळी गावातल्या त्या आतल्या रोडला सापडली. गाडी अर्थातच रिकामी होती. आता अशा अवस्थेत तुला एकट्याला सोडायची रिस्क मी नाही घेवू शकत मित्रा.”

“कमॉन ब्रिगेडियर, चैतन्य इज नॉट द लास्ट मॅन. इतर कुणी अरेंज कर, आता वेळ थोडा आहे. एक लक्षात घे, पख्तुनीचा आतापर्यंतचा इतिहास लक्षात घेतला तर चैतन्यला सद्ध्या तरी काही धोका नाहीये. अशा पद्धतीने तो भ्याडासारखा चैतन्यला काही अपाय करणार नाही. कदाचित – कदाचित आपण समजतो तसे नसेलही. चैतन्यला दुसर्‍याच कोणी लोकांनी अपह्रत केलेले असु शकते.”

डॉ. चिटणीस बोलत होते पण त्यांचा स्वतःचाच स्वतःच्या शब्दांवर विश्वास बसलेला नाहीये हे त्यांच्या चेहर्‍यावरून स्पष्ट होत होते.

“पण काहीही असो बिगेडियर आता आपण वेळ घालवू शकत नाही. अब चाहे जो हो जाये.”

तेवढ्यात चक्रवर्तींचा फोन वाजला. कुठलातरी अननोन नंबर होता.

“अस्सलाम वालेकुम चक्रवर्ती साहब. खैरियत तो है?”

पलिकडचा आवाज चक्रवर्तींनी कितीतरी वेळा रेकॉर्डसमधुन ऐकला होता. तो आवाज ऐकताच त्यांच्या अंगावर शहारा आला. आधी चैतन्यचे गायब होणे आणि आता हा आवाज……! त्यांची खात्री पटली की आपला संशय खराच होता.

“बोलो पख्तुनी, तो इस बार शुरुवात करही दी तुमने?”

“किसी ना किसी को तो करनीही थी! आणि तुम्ही डॉक्टरसाहेबांना आपल्या पदराआड घेवुन बसला आहात म्हणल्यावर तुम्हाला शह देण्यासाठी हा एकमेव मोहरा होता माझ्याकडे.”

“तुला काय वाटलं? चैतन्यसाठी म्हणून मी डॉक्टरांना तुझ्या हवाली करेन? अरे चिटणीसांपुढे असे हजारो चैतन्य आणि चक्रवर्ती ओवाळून टाकेन मी. तुला…….

“अच्छा, तो उनका नाम डॉ. चिटणीस है , आर यु टॉकींग अबाऊट डॉ. सिद्धार्थ चिटणीस? माय गुडनेस, हे मला आधीच कसं ओळखता आलं नाही. या प्रोजेक्टचा ब्रेन एखादा जिनीयस जैव शास्त्रज्ञच असु शकतो.”

पख्तुनी अगदी खुनशी पणे हसला आणि चक्रवर्तींच्या लक्षात आले की अगदी साध्या पद्धतीने पख्तुनीने त्यांच्याकडून डॉक्टरांचे नाव काढून घेतले होते. आता चिटणीसांचा सहभाग उघड झाला होता, त्यांच्यावरचा धोका आता शंभर पटींने वाढला होता. ते काही बोलणार तेवढ्यात डॉ. चिटणीसांनी त्यांच्या हातातील फोन हिसकावून घेतला.

“पख्तुनी… डॉ. चिटणीस हिअर!”

“अस्सलाम वालेकुम , कधी भेटताय डॉक्टर?”

“मी तुला हवा तेव्हा भेटायला तयार आहे पख्तुनी. पण ती फाईल डिकोड करण्यासाठी लागणारे ते गॅजेट माझ्याकडे नाहीये. ते सद्ध्या सरकारी तिजोरीत सुरक्षीत आहे. आता राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय मलाही अ‍ॅक्सेस नाहीये तिथे.”

“इतका मुर्ख वाटलो का मी तुम्हाला डॉक. असो, पण गॅजेटबद्दल मी बोललेलोच नाहीये सर. मला आता फक्त तुम्ही, डॉ. चिटणीस हवे आहेत. असली फुटकळ गॅजेट्स बनवणारे खुप एक्सपर्टस आहेत आमच्याकडे. आम्हाला फक्त तुमचे दोन्ही डोळे हवे आहेत आणि ते मिळाले की आम्ही तुम्हाला सोडून देऊ, डोंट वरी.”

फोन कट झाला.

“अरेच्च्या फोन कट झाला.” डॉ. हातातल्या निष्प्राण फोनकडे पाहात बोलले.

“येइल परत लगेचच. तीन मिनीटांपेक्षा जास्त नाही बोलणार तो एका वेळी. दहा-पंधरा मिनीटात येइलच फोन. एक मिनीट…..”

चक्रवर्तींनी आपला इटरकॉम उचलला आणि आपल्या सेक्रेटरीला काही सुचना दिल्या.

“हे बघ, थोड्या वेळातच माझ्या सेलफोनवर एक फोन येइल. ट्रेस करा… मला फोन करणार्‍याचा ठावठिकाणा हवा आहे.”

पाचच मिनीटात फोन परत वाजला…..

यावेळी मात्र चिटणीसांनीच फोन उचलला.

“वाईल्ड हॉक हिअर…..”

“वाईल्ड हॉक?”

चिटणीसांनी त्या शब्दाचा न राहवून जोरात उच्चार केला. त्यांना खरेतर पख्तुनी अपेक्षित होता. पण हा आवाज….

ब्रिगेडीअर चक्रवर्तींनी अक्षरशः झडपच घातली फोनवर…

“येस वाईल्ड हॉक, हंटर धिस एन्ड……………………………!”

डॉ. चिटणीस त्यांच्याकडे बावळटासारखे पाहातच राहीले.!

**********************************************************************************************************************************

क्रमशः

 

25 responses to “रॉंग नंबर : भाग ५

 1. Priya

  डिसेंबर 30, 2011 at 3:27 pm

  अरे अरे पुन्हा एकदा क्रमश:? म्हणजे पुन्हा एकदा एक महिना वाट पहावी लागणार पुढच्या भागासाठी…. 😦
  anyways good as usual

   
 2. Priya

  जानेवारी 8, 2012 at 1:34 सकाळी

  ya maliketali pahili gosht mi kochi madhye suru keleli ani punyat ale tari ajun sampali nahiye…lolzzzzzzzzzz

   
 3. manasi

  जानेवारी 9, 2012 at 8:53 pm

  nice
  but always to be contonued. not good

   
  • विशाल कुलकर्णी

   जानेवारी 10, 2012 at 10:56 सकाळी

   कालाय तस्मै नम: , म्हणजे आमच्या संस्कॄतच्या ज्ञानानुसार काळापुढे कोणाचेच औषध चालत नाही.:P जेव्हा काळ अनुकुम असेल तेव्हा पुढचा भाग येइलच 😉
   मन:पूर्वक आभार 🙂

    
   • Manasi Abhay

    जानेवारी 12, 2012 at 9:37 सकाळी

    i love late Shri.Shas Shirvalkar all stories.irani,insp mukesh,blue eyes adv.then baburao arnalkar.
    I think no one have that power to write thrilling stories .We cannt stop ourselves without completing the story. “Solid” i firstly read suhas shirvalkar and i really then cannt stop reading his books.I think all the books he wrote,i read.
    when i read just thinking as “chala vachun tar baghuya” ,it feels good while reading ur stories.Thanks.

     
 4. Mandar Kulkarni

  जानेवारी 16, 2012 at 4:54 pm

  Parat Kramasha::::::?????………wat pahan khup trasdayak asat sir

   
 5. Manasi Abhay

  जानेवारी 17, 2012 at 1:01 pm

  u posted last 5 th part on 22nd dec.a month gap is there why?

   
 6. Priya

  जानेवारी 22, 2012 at 10:32 सकाळी

  Ek suggestion dete…….tu jar pudhache bhag takayala itka wel lavalas tr magache bhag wisarale jatayet tyamule wachanatali utsukta ani godi nighun jate……so lwkr lwkr pudhache bhag takat ja……free ka advice hain lena hian to le lo 😀

   
 7. Manasi Abhay

  जानेवारी 24, 2012 at 10:31 सकाळी

  just tell us the date ,ur posting ur next episode

   
 8. Manasi Abhay

  जानेवारी 24, 2012 at 10:32 सकाळी

  Whatever priya is saying is very right and true.

   
  • विशाल कुलकर्णी

   जानेवारी 30, 2012 at 10:17 सकाळी

   लवकरच लिहीतोय, अजुन थोडा वेळ द्या प्लीज ! 🙂

    
   • Manasi Abhay

    जानेवारी 30, 2012 at 9:12 pm

    boss we r waiting from last 1 month. how much time u required then?i m telling u i read 3 times the story thinking may now i can read next but………………
    what is this?
    why this waiting waiting ji?

     
   • विशाल कुलकर्णी

    जानेवारी 31, 2012 at 11:37 सकाळी

    अजुन ३-४ दिवस फ़क्त, क्षमस्व 🙂

     
 9. Priya

  फेब्रुवारी 3, 2012 at 4:44 pm

  hahaha vishal…ewadhi wat tr new release chi panpahat nahit lok movie chya……u r bcmng celebrity 🙂 lolzzzzz

   
 10. anjali

  फेब्रुवारी 6, 2012 at 4:11 pm

  next part kadhi

   
 11. khush

  फेब्रुवारी 17, 2012 at 9:26 pm

  Are mitra Vishal ..kiti vel lavtos baba pudhacha bhag lihayala …magil bhag visarayala hote ..tyamule wachanatali godi nighun jate

   
 12. JAYESH

  फेब्रुवारी 17, 2012 at 11:34 pm

  lavkarach lavkarach???????
  he atich hotay ha……………………….plz yaar…………..lavkar tak na pudhcha bhag……??? 🙂

   
 13. Priya

  फेब्रुवारी 27, 2012 at 4:24 pm

  vishal dada ata 2 mahine zaale…ya welela jast pragati zali apali..adhi cha bhag eka mahinyani takala hotat …ata 2 mahine zaale tari patta nahiye pudhachya bhagacha….
  jahir nishedh 🙂 😀

   
 14. Jagdish

  मे 2, 2012 at 11:21 सकाळी

  are bapare next post la kiti ushir. ashya chan goshti vachayachi chatak lavayachi ani…… kadhi yenar pudhachya posts?

   
  • विशाल कुलकर्णी

   मे 3, 2012 at 11:57 सकाळी

   जगदिश, गेले काही महिने ऑफ़ीसकामात खुप अडकलो आहे, त्यामुळे इच्छा असुनही विलंब होतोय. 😦
   आभार्स !

    
 15. haris

  जुलै 11, 2012 at 12:57 सकाळी

  great one i like respect your eforts

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: