RSS

जगजीत गेला : एक सोनेरी स्वप्न भंगले….

10 ऑक्टोबर

मुंह की बात सुने हर कोई
दिलके दर्द को जाने कौन?
आवाजोंके बाजारोमें…
खामोशी पहचाने कौन?

साधारण १९९८ चे साल असावे. नुकताच आमचा कितवातरी प्रेमभंग झाला होता. पण यावेळेस मामला थोडा सिरियस होता. त्यामुळे बर्‍यापैकी आतपर्यंत जखम झालेली. आणि अशा वेळी कुठल्यातरी गझलेच्या या ओळी कानावर आल्या. शब्द कुणाचेका असेनात, पण त्या गायकाच्या आवाजातली कसक, तो दर्द थेट आतपर्यंत जाऊन पोहोचला. थोडे खोलात जाताच कळाले की तो जगजीत होता. मग जगजीतचे वेडच लागले.

तशात नेमका दुरदर्शनवर ‘मिर्झा गालिब’ पाहण्यात आला. गुलझार दिग्दर्शित या चित्रपटात ‘मिर्झा गालिब’च्या गझलांना जगजीतसिंग यांनी आवाज दिला होता. तोपर्यंत गालिब कधी समजलाच नव्हता. पण जगजीतजींच्या तोंडून गालिबला ऐकताना मनापासुन गालिबला समजावुन घेण्याची इच्छा निर्माण झाली आणि तेव्हापासुन जे गझलांचे वेड लागले ते आजतागायत कायम आहे.

jagjitsingh

८ फेब्रुवारी १८४१ रोजी राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे जन्मेलेल्या जगजित यांनी गजलगायकीच्या क्षेत्रात अक्षरशः राज्य केले. ७० ते ८० च्या दशकात पत्नी चित्रा सिंग हीच्या साथीने त्यांनी गजल घराघरात नेऊन पोहचवली. जगभर झालेल्या मैफलींसोबत त्यांनी टीव्ही आणि सिनेमामधूनही गझलप्रसार केला.

आज ते हिंदुस्तानी गझलगायकीला पडलेलं हे सोनेरी स्वप्न भंगलं. आखिरी हिचकी तेरे शानों पे आये , मौत भी मैं शायराना चाहता हूँ … आ तुझे मै गुनगुनाना चाहता हूँ… अशा लडिवाळ स्वरात मृत्युलाही गुंतवण्याचे स्वप्न पाहणारा गजलसम्राट जगजित सिंह यांनी सोमवारी सकाळी जगाचा निरोप घेतला. गेले काही दिवस त्यांच्या मेंदूतील रक्तस्रावावर लिलावतील रुग्णालयात उपचार सुरू होते.

२३ सप्टेंबर रोजी त्यांना मेंदूतील रक्तस्रावाचा त्रास सुरू झाल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वसनाचा आधार घेऊन उपाचार सुरू होते. पण सोमवारी आठच्या सुमारास त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणे थांबवले आणि अखेरचा श्वास घेतला.

जगजितने गायलेली माझी आवडती गझल

मटामधील मुळ बातमी : गझलगायकीचा (जगजित) सिंह स्वरांच्या पडद्याआड

जगजीतजींचा आतापर्यंतच प्रवास

बरेच काही लिहायचेय पण सद्ध्या ते शक्य नाही. सद्ध्या बोटे कापताहेत हे लिहीतानाही. जगजीतजींना माझी आणि माझ्यासारख्या असंख्य चाहत्यांची सश्रद्ध आदरांजली !

विशाल…….

 

4 responses to “जगजीत गेला : एक सोनेरी स्वप्न भंगले….

 1. सुहास

  ऑक्टोबर 10, 2011 at 12:40 pm

  गझलसम्राटाला विनम्र आदरांजली 😦 😦

   
 2. देवेंद्र चुरी

  ऑक्टोबर 10, 2011 at 11:00 pm

  विनम्र आदरांजली.. 😦

   
 3. विशाल कुलकर्णी

  ऑक्टोबर 11, 2011 at 11:42 सकाळी

  खरेतर तो कुठेच गेलेला नाही. तो जाऊच शकत नाही आपल्या स्मृतीतून. तो कायम राहील त्याच्या सुरांच्या रुपात, त्याने गायलेल्या गझलांच्या रुपात ! आम्ही तुला कधीच विसरु शकणार नाही जगजीत, कधीच नाही………. 😦

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: