RSS

आपण राष्ट्रगीताची अवहेलना सहन करणार आहोत काय?

01 मार्च

स्वातंत्र्यापुर्वीचा काळ ! साधारण १९१० ते पुढचा…..

सगळ्या भारतभर स्वातंत्र्याचे वारे सुरू झाले होते. मवाळ आणि जहाल असे दोन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने ब्रिटीश सरकारचा विरोध करत होते. ब्रिटीश सत्ता उलटून लावायचा प्रयत्न करत होते. ब्रिटीश सरकार मात्र दोन्ही चळवळी अतिशय निर्दयतेने मोडून काढत होते. गांधीजींचे सत्याग्रह आणि क्रांतीकारकांच्या जहाल कारवाया यांना अजिबात दाद न देणारे ब्रिटीश सरकार त्या काळात फ़क्त दोन शब्दांना घाबरत होते असे म्हटले तर अतिषयोक्ती वाटेल कदाचित पण ती सत्य परिस्थिती आहे….

“वंदे मातरम…!”

हे दोन शब्द उच्चारायला देखील बंदी होती. शिरीषकुमार, वीणाकुमारी सारख्या क्रांतीकारकांना केवळ ’वंदे मातरम” चा जयघोष केला या कारणापायी ब्रिटीशांच्या रोषाचे धनी व्हायला लागले होते. शिरीषकुमारला तर आपले प्राण गमवावे लागले. असे काय होते त्या दोन शब्दात? क्रांतीकारकांना, सत्याग्रहींना दाद न देणार्‍या ब्रिटीशांचा थरकाप उडावा अशी कुठली शक्ती होती त्या शब्दात? आ. बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७६ ते १८८२ च्या दरम्यान लिहीलेले हे गीत त्यांच्या १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या “आनंदमठ” या कादंबरीत समाविष्ट केलेले होते. पुढे त्यांचा भारताचे राष्ट्रीय गीत म्हणुनही विचार करण्यात आला होता. १८९६ मध्ये कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात आचार्य रविंद्रनाथ टागोर यांनी सर्व प्रथम हे गीत गायले. त्या काळात वंदे मातरम हा शब्द क्रांतीकारकांसाठी, देशभक्तांसाठी परवलीचा शब्द बनला होता. ब्रिटीशांनी “वंदे मातरम” या शब्दांचा इतका धसका घेतला होता की सार्वजनिक जागी त्याचा उच्चार करण्यावरदेखील बंदी घालण्यात आली होती. १९०७ साली जर्मनीमध्ये स्टुटगार्ड येथे मादाम भिकाजी कामा यांनी सादर केलेल्या भारताच्या पहिल्या ध्वजात त्यांनी ‘वंदे मातरम’ या शब्दांचा वापर केला होता.

मादाम कामा यांनी तयार केलेला पहिला भारतीय ध्वज

या गाण्याच्या पहिल्या कडव्याला भारतीय संविधानाने “राष्ट्रगीता”चा दर्जा दिलेला आहे.

असं नक्की काय होतं ‘वंदे मातरम’ या गीतात… ज्याने अर्ध्या जगावर राज्य करणार्या ब्रिटीश सत्तेचा थरकाप उडवला होता !

स्व. बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी संस्कृत आणि बंगाली अशा भाषांमध्ये मिळुन लिहीलेले मुळ वंदे मातरम….

वन्दे मातरम्
वन्दे मातरम्
सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्
सस्यश्यामलाम् मातरम्।

शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम् ॥ १ ॥
वन्दे मातरम् ।

कोटि – कोटि – कण्ठ कल – कल – निनाद – कराले,
कोटि – कोटि – भुजैर्धृत – खरकरवाले,
अबला केन मा एत बले।
बहुबलधारिणीम् नमामि तारिणीम्
रिपुदलवारिणीम् मातरम् ॥ २ ॥
वन्दे मातरम् ।

तुमि विद्या, तुमि धर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं हि प्राणाः शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारइ प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे ॥ ३ ॥
मातरम् वन्दे मातरम् ।

त्वम् हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी,
नमामि त्वाम् नमामि कमलाम्
अमलाम् अतुलाम् सुजलाम् सुफलाम् मातरम् ॥ ४ ॥
वन्दे मातरम् ।

श्यामलाम् सरलाम् सुस्मिताम् भूषिताम्
धरणीम् भरणीम् मातरम् ॥ ५ ॥

वन्दे मातरम् ।

स्व. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय

*******************************************************

या गीताचा आपले ब्लॉगर मित्र श्री. नरेंद्रकाका गोळे यांनी केलेला हा मराठी अनुवाद…

आई तुला प्रणाम

आई, तुला प्रणाम ॥ धृ ॥

सुजल तू, सुफल तू, मलयानिलशीततू,
हरीतशस्यावृत्त तू,
चांद्रज्योत्सनापुलकित यामिनी,
उदितपुष्प-लता-वनांनी विभूषिते,
सुहासिनी, सुमधूर भाषिणी,
सुखदा, वरदायिनी ॥ १ ॥
आई, तुला प्रणाम

कोटी कोटी मुखांनी अभिव्यक्त तू,
कोटी कोटी बाहूंचे बल प्राप्त तू,
अबला कशी? महाशक्ती तू ।
अतुलबलधारिणी, प्रणितो तुज
तारिणी शत्रुदलसंहारिणी, तुला प्रणाम ॥ २ ॥
आई, तुला प्रणाम

तू विद्या, तू धर्म, तू हृदय,
तू मर्म, तूच प्राण अन् कुडीही,
तूच मम बाहूशक्ती,
तूची अंतरीची भक्ती,
तुझीच प्रतिमा वसे, हर मंदिरी,॥ ३ ॥
आई, तुला प्रणाम

तू ची दुर्गा, दशप्रहरणधारिणी,
कमला, कमलदल विहारिणी,
वाणी विद्यादायिनी, तुला प्रणाम,
कमले तुला प्रणाम, अमले, अतुले,
सुजले, सुफले, आई ॥ ४ ॥
आई, तुला प्रणाम

श्यामले, सरले, सुस्मिते, भूषिते,
तूच घडवी, पोषी तू, आई ॥ ५ ॥
आई, तुला प्रणाम

===

मराठी रुपांतर – श्री. नरेंद्र गोळे

***********************************************************************************************

आज हे सगळं पुन्हा लिहायचं कारण म्हणजे “आपल्याला खरोखर आपल्या या ज्वलंत, क्रांतीकारक राष्ट्रगीताबद्दल किती आदर आहे? या काव्याबद्दल आपल्या मनात नक्की कुठली भावना आहे याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज क्रिकेट विश्व चषक २०११ साठी या काव्याचा व्यापार मांडला जातोय. टाईम्स ऑफ इंडीया, रेडीओ मिर्ची, फिवर १०४ एफ्.एम. अशा वाहिन्यांवर “वंदे मातरम” या महान काव्याचे चक्क “वन-डे मातरम” असे भ्रष्ट बाजारीकरण केले जात आहे. खालील जाहीरात बघा……

ही राष्ट्रगीताची अवहेलनाच नाही का?

हा केवळ आपल्या राष्ट्रगीताचाच नव्हे तर आपला, आपल्या राष्ट्राचा, आपल्या स्वत्वाचा अपमान आहे.

आपण या साठी काय करणार आहोत? सगळ्या ब्लॉगर मित्रांना विनंती आहे, की ही माहिती आपापल्या ब्लॉगवर द्या. टाईम्स ऑफ इंडीया, रेडीयो मिरची, फिवर १०४ एफ्.एम. चा जाहीर निषेध करा. ‘टाईम्स ऑफ इंडीया’ वाचणे बंद करायला हवे…..! त्यांच्यापर्यंत हा उद्रेक पोहोचायलाच हवा. तो पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. किमान ५०% ब्लॉगर्सनी जर हा निषेध आपल्या ब्लॉगवर व्यक्त केला तरी खुप काही साधता येइल. माझी सर्व ब्लॉगर मित्रांना विनंती आहे की त्यांनी आपला हा निषेध शक्य त्या मार्गाने संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. ब्लॉग, फेसबुक, बझ्, ट्वीटर जिथे जिथे म्हणून हा निषेध व्यक्त करता येइल तिथे तिथे करा. आपल्या मित्रांना इमेल मधुन ही माहिती पाठवा. ज्यांना ब्लॉगवर किंवा इतरत्र निषेध करणे शक्य नाही ते हिंदु जागृतीच्या या दुव्यावर जावून आपला निषेध व्यक्त करु शकतात.

http://www.hindujagruti.org/news/11376.html

एक लक्षात ठेवा राष्ट्रागीताचा असा व्यावसायिक वापर करणे हा भारतीय संविधानानुसार राष्ट्रिय प्रतिक/ घोषणा/ काव्य/ गीत याचा अपमान देखील आहे. चला मित्रांनो एकत्रीतपणे याविरुद्ध आवाज उठवू या.

आपण एवढे तरी निश्चितच करु शकतो………….!

 

22 responses to “आपण राष्ट्रगीताची अवहेलना सहन करणार आहोत काय?

 1. सुहास

  मार्च 1, 2011 at 12:45 pm

  तीव्र निंदनीय वर्तन टाइम्स आणि एफम चॅनेल्सचे….
  मी ही पोस्ट मनसे आणि शिवसेना दोन्ही साइटवर टाकतो अभिप्राय या सदरात….

   
 2. विशाल कुलकर्णी

  मार्च 1, 2011 at 12:49 pm

  लगेचच टाक सुहास ! त्यांनी मनावर घेतले तर उत्तमच , मी ही टाकतो तिथे. संपर्कात द्यावे लागेल का?

   
  • सुहास

   मार्च 1, 2011 at 1:21 pm

   हो तिथेच टाक… मी दोन्ही ठिकाणी लिंक दिली आहे ह्या लेखाची….

    
 3. vikram

  मार्च 1, 2011 at 2:03 pm

  😦

   
 4. शिरीष

  मार्च 1, 2011 at 2:55 pm

  जोपर्यंत तुम्ही आपले जुनेच खेळणे सोडवून (म्हणजे मोडून) पुन्हा आहे तसे अंगी भिनवून (म्हंजे अंगीकरून) जुळवू शकत नाही तोपर्यंत केवळ ते गीत गाऊन फार काही मिळवत नाही… त्याने कोणतीही जाज्वल्य राष्ट्रभक्ती सिद्ध होत नाही

  हेच आपण अयोध्येतील राममंदीर निर्माणाबाबतही बोलू शकतो…

  की नाही…

   
  • विशाल कुलकर्णी

   मार्च 1, 2011 at 3:12 pm

   त्रिवार मान्य !!
   पण त्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारे राष्ट्राभिमान जागृत ठेवण्यासाठी ती श्रद्धा मनात निर्माण व्हावी लागते आणि त्यासाठी निदान जे आपल्या हातात आहे ते करणे भाग आहे.
   <>>
   यासाठी मुळात आधी ते खेळणे किती महत्वाचे आहे ही भावना मनात निर्माण व्हायला हवी. त्यासाठी अशा चुकीच्या गोष्टींना विरोध करणे अत्यावश्यकच ठरते.

   इथे केवळ गाणे म्हणा किंवा गाण्याबद्दल आदर बाळगा अशी इछ्छा- अपेक्षा नाहीच आहे मुळी, तर ते गाणे हे राष्ट्राचे प्रतिक आहे, त्याचा अपमान होवू नये अशी आहे.
   राममंदीर हा वेगळा मुद्दा आहे. तिथे धर्माचा विषय येतो, त्यावर काही लिहीण्यात किंवा करण्यात मलाही स्वारस्य नाही. पण जिथे देशाचा प्रश्न उभा राहतो तिथे जे म्हणुन शक्य आहे ते करायलाच हवे. राष्ट्रगीत हे प्रतिक असते देशाचे ! कुठल्याही प्रकारे त्याचा अपभ्रंश, त्याची अवहेलना हा देशाचा अपमान ठरतो.

    
   • शिरीष

    मार्च 1, 2011 at 3:27 pm

    ह्या देशात इंग्रजी शिकायला काही अडचण नाही पण मातृभाषेतला मजकूर वाचायला मिळणे कठीण जाहले तेव्हा त्या सनातन पुरुषार्थाचे मनात काय जाहले असेल…

    तसेच जेव्हा आपलेच शरीर मळते तेव्हा स्नान करणे आवश्यक असते…

    शरीरं खलु माध्यमम्

    असे काहीतरी संस्कृत वचन आहे असे वाटते..

    वेश्यावस्तीत गेल्याने जर आपण पातकी ठरत असू तर ने नक्की दुर्देवी आहे… आपण तेथे काय करण्यासाठी गेलोय हे ध्यानात ठेवून मर्यादशील वागणे अधिक उत्तम…

    निधर्मी देशात राष्ट्रधर्म नक्की कोणता?

    ह्यावर कोणाशी संवाद साधता आला तर अवश्य…

     
 5. शिरीष

  मार्च 1, 2011 at 3:38 pm

  क्रिकेट नांवाचे एक भूत आपल्या गळ्यात घालून त्यातच सचिन नांवाचा एक मणि विराजमान आहे… ह्यावर आपले सर्वांचे मत एखांद्या लेखाचा विषय नक्की बनू शकतो…

  कबड्डी मलेशियात पोहोचली आणि तिथे त्याचे नामकरण सद्गुरु असे करण्यात आले हे कोणी वाचले आहे का…?

   
  • विशाल कुलकर्णी

   मार्च 1, 2011 at 3:51 pm

   सद्गुरु…? हे माहीत नव्हते. कारण माझ्या माहितीप्रमाणे मलेशियाच्या कबड्डी संघटनेचे नाव “The Kabaddi Association of Kuala Lumpur (KAKL) असेच आहे. बाकी माहितीबद्दल आभार. आणखी काही संदर्भ देवु शकाल का? या विषयावर जास्तीत लोकांना माहिती होणे खुप आवश्यक आहे. आपले देशी खेळ जगभर पोचतायत आणि आपल्या देशात मात्र त्याला म्हणावे तेवढे महत्व दिले जात नाही ही गोष्ट खरेच खुप खेदजनक आहे. तुमच्याकडे अजुन काही माहिती असल्यास मला vkulkarni.omnistar@gmail.com या पत्त्यावर पाठवाल काय? धन्यवाद.

    
   • विशाल कुलकर्णी

    मार्च 1, 2011 at 4:36 pm

    मी विचारलेली माहिती तुम्ही अजुनही दिलेली नाहीये. मग याचा अर्थ तुम्हाला फ़ुकटचा टाईमपास करायचाय असा घ्यायचा का मी?

     
   • शिरीष

    मार्च 2, 2011 at 10:51 सकाळी

    आपल्या आवडीच्या सर्च इंजिनवर “sadugudu game” हे टाकून पहा…
    सगळ्यात कमी कचरा माहिती मला guruji.com वर भासली…

    मला तुमच्या ई-मेल पत्त्याच ??? नाही…

     
  • विशाल कुलकर्णी

   मार्च 1, 2011 at 3:53 pm

   <>> हे थोडं अस्पष्ट वाटतय. तुमचा क्रिकेटला विरोध असणे पटू शकतेय, पण रत्नाला मणी म्हणणे खटकतेय. माफ़ करा स्पष्टपणे असहमती जाहीर केल्याबद्दल.
   आपल्याकडे आपल्या हॊकीसारख्या राष्ट्रीय खेळाला डावलुन क्रिकेटला अवाजवी महत्व दिले जातेय ही गोष्ट मलाही खटकते.

    
   • शिरीष

    मार्च 1, 2011 at 4:14 pm

    कधी मौल्यवान धातुकारागिरा कडे गेलात की कळेल की रुद्राक्षाला देखिल तो कारागिर मणीच म्हणतो…

    जरा पुस्तकी शिकण्यापेक्षा कारागिरी करायचा प्रयत्न करा…

     
   • शिरीष

    मार्च 1, 2011 at 4:28 pm

    जी गोष्ट मी छान खेळू शकतो त्याला विरोध कसा करीन … फारतर अवरोध करीन… आणि तो आपणही करू शकता..

     
  • विशाल कुलकर्णी

   मार्च 3, 2011 at 12:34 pm

   कबड्डी मलेशियात पोहोचली आणि तिथे त्याचे नामकरण सद्गुरु असे करण्यात आले हे कोणी वाचले आहे का…?…..

   तुमच्यासारखे अर्धवट लोक, अर्धवट शुद्धीत काही वाचतात आणि इतरत्र जाऊन काही बाही बरळतात आणि आपलेच हसु करुन घेतात.
   तुमच्या माहितीसाठी म्हणून तो शब्द सद्गुरु असा नसुन सदु-गुडू असा आहे. आपल्याकडे जसे कब..ड्डी…ड्डी…ड्डी…ड्डी…ड्डी…ड्डी…ड्डी…ड्डी…ड्डी… म्हणत समोरच्या संघावर आक्रमण केले जाते. तसे त्यात खेळाडुने सदु-गुडू…गुडू…गुडू…गुडू…गुडू…गुडू…गुडू…गुडू…गुडू…गुडू…गुडू…गुडू… असे म्हणत आक्रम्ण करायचे असते.
   इथे पाहा… http://almostinfamous.blogspot.com/2007/05/sami-gudu.html

   या लेखकाचे असे म्हणणे आहे की “सदु-गुडू” हा मुळ खेळ आहे ज्यावरून कबड्डीची रचना केली गेली. जे सत्य असु शकते.

   एक नजर इथेही मारा… http://www.indianetzone.com/1/kabaddi.htm

   इथे दिलेल्या माहितीनुसार कबड्डीचे सदुगुडू हे नामकरण मलेशियात झालेले नसुन ते भारतातीलच आहे. सदुगुडू हा तमिळ शब्द आहे.
   Kabaddi is probably the only game of offence and defense in which attack is an individual attempt, while defense is a combined effort. The Tamil speaking people know the game in various names like Kabaddi, Sadugudu, Gudugudu, Palinjadugudu and Sadugoodatthi (Tamil). The word `Kabaddi` may have originated from the Tamil words kai (hand) and pidi (catch). Kabaddi is also known as Chedugudu or Hu-Tu-Tu in southern parts of India, Hadudu (Men) and Chu – Kit-Kit (women) in eastern India, and as Kabaddi in northern India. The sport has earned a lot of popularity in the other Asian nations like Nepal, Bangladesh, Sri Lanka, Japan and Pakistan.

   यापुढे कुठलेही विधान करण्यापुर्वी नीट खात्री करुन घ्या, नाहीतर विनाकारण मुर्खपणाच्या दोषाचे धनी व्हाल. उगीच शब्द साधर्म्याचा गैरफ़ायदा घेवुन सदु-गुडू चे सद्गुरू करु नका.

    
 6. विशाल कुलकर्णी

  मार्च 1, 2011 at 4:19 pm

  माफ़ करा शिरीष, पण तुम्ही मुद्दा सोडून भरकटता आहात. रच्याकने कारागिर वगैरे झालं त्या विषयातील तज्ञ व्यक्तींशी बोलताना. सामान्य जनांशी बोलताना त्यांच्या भाषेतच बोलणे अधिक उत्तम नाही का? असो या विषयावर चर्चा आपण माझ्या मेलवर करु या का? मी वर ईमेल दिलाय माझा. या लेखाचा विषय वेगळा आहे. आणि मी पुस्तकी शिकतो की प्रत्यक्ष कारागिरीही करतो याबद्दल उगाचच अंदाज का बांधताय? हिरा आणि मणी या शब्दातला फ़रक जाणुन घेण्याचा प्रयत्न करा ना.

   
 7. मंदार दिलीप जोशी

  मार्च 1, 2011 at 5:58 pm

  संपूर्ण पटले.

   
 8. Narayani Barve

  मार्च 1, 2011 at 9:34 pm

  तुम्ही म्हणता हे बरोबर आहे. याचा निषेध व्हायलाच हवा.
  तुमच्या लिखाणात एक “टायपो” आहे ती मात्र दुरुस्त करा. “आ. बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १९७६ ते १९८२ च्या दरम्यान लिहीलेले हे गीत त्यांच्या १९८२ साली प्रसिद्ध झालेल्या “आनंदमठ” या कादंबरीत समाविष्ट केलेले होते.” या ठिकाणी १९७६ ते १९८२ च्या ऐवजी १८७६ ते १८८२ हवे आहे का ?

   
  • विशाल कुलकर्णी

   मार्च 2, 2011 at 9:57 सकाळी

   धन्यवाद नारायणीजी 🙂
   टायपो दुरुस्त केल्या आहेत. प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार !!

    
 9. हेरंब

  मार्च 1, 2011 at 9:46 pm

  क्रिकेट म्हणजे माझंही जीव की प्राण आहे पण म्हणून राष्ट्रीय प्रतीकांचा वापर करून क्रिकेटचे गोडवे गाण्याची व्यावसायिक प्रवृत्ती निषेधार्हच.. त्रिवार निषेध ! ज्या कोणाच्या फाटक्या मेंदूतून ही कल्पना आली असेल तो लवकर ‘बरा’ होवो.

  रच्याक, ‘काही’ (नेहमीच्या यशस्वी) प्रतिक्रिया वाचून करमणूक झाली. !!

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: