RSS

आपण कधी शिकणार आहोत धडा घ्यायला?

26 नोव्हेंबर

२६/११ च्या त्या काळरात्रीला आज शुक्रवारी दोन वर्षे पुर्ण होत आहेत. त्या रात्री दहशतवाद्यांनी मांडलेले थैमान, छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानक तसेच इतरत्र गेलेले निरपराधांचे बळी, हा हल्ला परतवुन लावताना धारातीर्थी पडलेले वीर अशा या क्रौर्य, शौर्य आणि वेदनेला आज दोन वर्षे होत आहे. त्या हत्याकांडाला बळी पडलेल्या सर्व असहाय नागरिकांना तसेच हा हल्ला छातीवर झेलुन स्वतःच्या प्राणाचे बलिदान देवुन दहशतवादाला आपले सामर्थ्य, आपली एकजुट दाखवुन देणार्‍या सर्व ज्ञात्-अज्ञात महावीरांना विनम्र श्रद्धांजली !

हुतात्मा हेमंतजी करकरे, हुतात्मा विजय साळसकरसाहेब आणि हुतात्मा अशोकजी कामते

हुतात्मा इन्स्पेक्टर शिंदे आणि त्यांचे वीर सहकारी

हुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन

यांच्या हौतात्म्याची किंमत काय?

इथे जो नृशंस हिंसाचार घडला तो आपण इतक्या सहजासहजी विसरलो की काय?

मी इथे परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो असे म्हणत नाहीये कारण ते देवाच्या नसुन आपल्या हातात आहे. कसाब, अफजल सारख्या कृरकर्म्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत त्यांच्या आत्म्यास शांती कशी मिळेल? ठिक आहे, अपराध्यांना शिक्षा देण्यात काही कायदेशीर प्रक्रियातून जाणे आवश्यक असते, त्यामुळे होणारा विलंब समजु शकतो. पण या घटनेतून आपण काय धडा घेतला हा प्रश्न पुन्हा शिल्लक राहतोच. आजतरी परिस्थिती बदलली आहे काय? देशाच्या सागरी सीमा आजतरी सुरक्षीत आहेत काय?

दहशतवाद्यांच्या दृष्टीने आजही भारत हे सॊफ़्ट टार्गेटच आहे.

सद्ध्या आपण फ़क्त एवढेच करु शकतो का.....?

त्या सर्व ज्ञात्-अज्ञात महावीरांना पुन्हा एकदा शतश: प्रणाम आणि विनम्र श्रद्धांजली !

आपण कधी शिकणार आहोत धडा घ्यायला?

विशाल

 

 

 

7 responses to “आपण कधी शिकणार आहोत धडा घ्यायला?

 1. Mandar Dilip Joshi

  नोव्हेंबर 26, 2010 at 11:03 सकाळी

  हल्ली यथा प्रजा तथा राजा असा उलटा प्रकार असल्याने याला आपणच जबाबदार आहोत 😦
  लेखाचं शीर्षक समर्पक आहे. “आपण कधी शिकणार आहोत धडा घ्यायला?”

   
  • विशाल कुलकर्णी

   नोव्हेंबर 26, 2010 at 11:06 सकाळी

   खरे आहे मित्रा. आजही आपण या घटनेतुन काहीही शिकलेलो नाही. हि खरी शोकांतिका आहे . 😦

    
 2. Manmaujee

  नोव्हेंबर 26, 2010 at 11:41 सकाळी

  भारतात आज सर्वात जास्त कोण सुरक्षीत आहे???

  मी म्हणेल ….. “अजमल कसाब”.

  काल तो मानवाधिकारवाला वाय.झेड. म्हणत होता “कसाबला फ़ाशी न देता सुधारण्याची संधी द्या”

  च्यायला त्याला अगोदर हे उध्वस्त झालेले संसार, रस्त्यावर आलेली बायका पोर दाखवा.

  या हल्ल्यानंतर काय झाल…. मेणबत्त्यांचा अन फ़ुलांचा व्यवसाय वाढला बस बाकी काही नाही.

  त्या ओंबळेच्या मुलीने पाच लाखाची अनाथांना देणगी दिली…उन्नीकृष्णन यांचे वडील आजही अभिमानाने मुलाचा पराक्रम सांगत सायकल फ़ेरी काढली…हे आहे देशप्रेम.

  खडसे अन आर आर पाटलांना कसाबच्या तुरुंगाची पाहणी करायला जाउ शकतात….मागच्या वर्षी अशोक चव्हाण तर सत्य साइ बाबा कडे गेला होता..पण साल्यांना शहींदांची घर दिसत नाही…विचारपुस तर सोडा त्यांना नाव जरी सांगता आली तरी खुप आहे.

  जाउ द्या विशाल भाउ….जय महाराष्ट्र म्हणायच शांतपणे २ मिनीट मौन पाळायच
  (खर सांगु का…आता ह्या अशा वागण्याचा पण वैताग आलाय…किती हतबल झालो आहोत???)

   
  • विशाल कुलकर्णी

   नोव्हेंबर 29, 2010 at 11:30 सकाळी

   <>>
   हो ना आणि आमचे मुख्यमंत्री त्या कार्यक्रमात राष्ट्रगीतासाठी दोन मिनीटे थांबण्याचे सौजन्यही दाखवु शकत नाही. तेही चरणजीतसिंग यांनी दृष्टीस आणुन दिल्यानंतरही. मुख्यमंत्री निघुन जात असताना चालु असणारे राष्ट्रगीत आपल्यालाही ऐकु येते आणि ते म्हणतात मला राष्ट्रगीताबद्दल माहितीच नव्हते. हरामखोर आहेत सगळे, आपणच पोसलेले 😦

    
 3. देवेंद्र चुरी

  नोव्हेंबर 26, 2010 at 12:09 pm

  खर आहे विशालदा…
  आपल्याला इतका संताप येतो ,हया राजकारण्यांना खरच काही वाटत नसेल का…ह्या पोस्टमधील प्रश्न असेच अनुत्तरीत राहणार… 😦

   
 4. anamika

  नोव्हेंबर 26, 2010 at 2:53 pm

  जो पर्यंत कणाहिन,बधिर्,संवेदनाशुन्य, भ्रष्टाचाराने बरबटलेले व सत्तेच्या उन्मादाने माजलेले अशी काहि ठराविक राजकारण्यांची एक नतद्रष्ट जमात व कळप हिंदुस्थानात आहे तो पर्यंत काही बदल होईल अशी अपेक्षा न केलेलीच बरी…..

   
  • विशाल कुलकर्णी

   नोव्हेंबर 29, 2010 at 11:25 सकाळी

   खरं आहे तुमचं म्हणणं अनामिका. हिच तर शोकांतिका आहे आपली. 😦

    

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: