RSS

ब्लॉग माझा३ स्पर्धेच्या विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन

21 नोव्हेंबर

मागच्या वेळी जेव्हा नीरजा, देवकाका,  दिपक तसेच डानरावांचे ब्लॉग ब्लॉग माझ्याच्या लिस्टमध्ये मानाने   झळकले तेव्हा खुप आनंद झाला होता. कुठेतरी मनात थोडीशी का होइना पण असुया देखील वाटली होती. वाटलं, आपला पण ब्लॉग या सगळ्या दिग्गजांबरोबर झळकला तर केवढी मज्जा येइल. मग तेव्हापासुन त्यानुसार ब्लॉगचे स्वरुप बदलले. आधी कवितेला वाहीलेला माझा ब्लॉग पुर्णपणे गद्यमय केला, त्यासाठी (कवितांसाठी) खास नवा ब्लॉग चालु केला. महेंद्रदादा, भुंगा, नीरजा, आणि अशा अनेक ब्लॉगर्सचे ब्लॉग वाचत राहीलो आणि त्यावरुन आपला ब्लॉग कसा असावा याची रुपरेखा ठरवली व त्यानुसार बदल घडवून आणत गेलो. आज त्या मेहनतीचं फळ मिळालं. ब्लॉग माझा -३ मध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळणं ही माझ्या मेहनतीला मिळालेली पावती आहे असे समजतो.

लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, सा. ‘साधना’) आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) या दिग्गज परीक्षकांनी निवडलेल्या ब्लॉग्स मधे आपला ब्लॉग येणं ही माझ्यासाठी तरी खुप आनंदाची आणि अभिमानाची बाब असून आपला ब्लॉग त्या ”तोडीचा” झालाय आता, यातुन मिळणारा आनंद काही औरच आहे.

आनंदाची बाब म्हणजे लागलेल्या ब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या निकालात, विजेत्यांत बहुसंख्य मायबोलीकरांचा, मीमराठीकरांचा तसेच आमच्या बझकर सुहदांचा  समावेश आहे. विजेत्यांची नावे व ब्लॉग्स खालील प्रमाणे.

विजेते ब्लॉग्ज

१. रोहन जगताप http://www.2know.in
२. प्रभाकर फडणीस www.mymahabharat.blogspot.com
३. सुनील तांबे http://moklik.blogspot.com/
४. नरेंद्र गोळे http://nvgole.blogspot.com/
५. मधुकर रामटेके http://mdramteke.blogspot.com/
६. तन्वी अमित देवडे www.sahajach.wordpress.com

उत्तेजनार्थ ब्लॉग्ज

१. अनघा निगावेकर http://restiscrime.blogspot.com/
२. विशाल कुलकर्णी https://magevalunpahtana.wordpress.com
3. गंगाधर मुटे http://gangadharmute.wordpress.com
४. सुहास झेले http://suhasonline.wordpress.com/
५. विवेक वसंत तवटे http://vivektavate.blogspot.com
६. एकनाथ जनार्दन मराठे http://ejmarathe.blogspot.com
७. सौरभ सुरेश वैशंपायन http://sahajsuchalamhanun.blogspot.com
८. रोहन कमळाकर चौधरी. http://mazisahyabhramanti.blogspot.com/
९. श्रद्धा भोवड www.shabd-pat.blogspot.com
१०. ओंकार सुनील देशमुख http://pune-marathi-blog.blogspot.com/
११. विठ्ठलराजे बबनराव निंबाळकर http://vitthalraje.blogspot.com/
१२. हेरंब ओक http://www.harkatnay.com/
१३. विनायक पंडित http://vinayak-pandit.blogspot.com
१४. मंदार शिंदे http://aisiakshare.blogspot.com
१५. आशिष अरविंद चांदोरकर http://ashishchandorkar.blogspot.com
१६. शंकर पु. देव http://www.shankardeo.blogspot.com/
१७. अमोल सुरोशे http://www.mukhyamantri.blogspot.com/
१८. नचिकेत गद्रे http://gnachiket.wordpress.com
१९. पंकज झरेकर http://www.pankajz.com/
२०. रणजीत शांताराम फरांदे http://zampya.wordpress.com/
२१. श्रेया देवेंद्र रत्नपारखी http://majhimarathi.wordpress.com
२२. जगदीश अशोक भावसार http://chehare.blogspot.com/
२३. मीनल गद्रे. http://myurmee.blogspot.com/
२४. शंतनू देव http://maplechipaane.blogspot.com/
२५. विद्याधर नीलकंठ भिसे. http://thebabaprophet.blogspot.com
२६. प्रवीण कुलकर्णी http://gandhchaphyacha.blogspot.com
२७. नचिकेत कर्वे http://www.muktafale.com
२८. जयश्री अंबासकर http://jayavi.wordpress.com/
२९. कविता दिपक शिंदे http://beautifulblogtemplates.blogspot.com
३०. परेश प्रभु http://www.marathipatrakar.blogspot.com/

शेवटी पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचे तसेच विजेत्या मायबोलीकरांचे, मीमकरांचे, बझकरांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि अर्थातच स्टार माझाचे शतशः आभार :).

माझा ब्लॉग  उल्लेखनीय ठरवला गेला ह्याचा मला आनंदच आहे! इतर सर्व उल्लेखनीय ठरलेल्या ब्लॉगर्सचे-ब्लॉग लेखकांचेही हार्दिक अभिनंदन. सर्व सहभागी ब्लॉग लेखकांचेही सहर्ष कौतुक आणि शुभेच्छा.

स्टार माझा ३ निकालाविषयी मुळ बातमी इथे वाचा… http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1669

विशाल कुलकर्णी

 

26 responses to “ब्लॉग माझा३ स्पर्धेच्या विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन

 1. सचिन

  नोव्हेंबर 21, 2010 at 4:20 pm

  दादा,

  अभिनंदन रे.

   
 2. विशाल कुलकर्णी

  नोव्हेंबर 21, 2010 at 4:29 pm

  धन्यवाद रे सचिन , खरंच खुप छान वाटतेय 🙂

   
 3. sahajach

  नोव्हेंबर 21, 2010 at 4:33 pm

  अभिनंदन विशाल 🙂

   
 4. विशाल कुलकर्णी

  नोव्हेंबर 21, 2010 at 4:55 pm

  मन:पूर्वक आभार तन्वी 🙂

   
 5. निरंजन

  नोव्हेंबर 21, 2010 at 6:26 pm

  हार्दिक अभिनंदन!!!

   
 6. Salil Chaudhary

  नोव्हेंबर 21, 2010 at 8:33 pm

  अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!

   
 7. Gangadhar Mute

  नोव्हेंबर 21, 2010 at 9:55 pm

  अभिनंदन. 🙂

   
  • विशाल कुलकर्णी

   नोव्हेंबर 23, 2010 at 9:24 सकाळी

   मन:पूर्वक आभार गंगाधरदादा आणि तुमचेही मनापासुन अभिनंदन 🙂

    
 8. Shyaamali

  नोव्हेंबर 22, 2010 at 12:37 सकाळी

  abhinandan vishal…manpurvak abhinandan 🙂 lihit raha

   
 9. sahajach

  नोव्हेंबर 22, 2010 at 8:59 सकाळी

  >>>> सहजराव
  🙂
  राव वाचून गंमत वाटली…

  सहजच- सौ.तन्वी देवडे

   
  • विशाल कुलकर्णी

   नोव्हेंबर 23, 2010 at 9:23 सकाळी

   😉 आरं तिच्या, अगो मोठीच गंमत झाली की. मी मोबाईलवर वाचला तुझा अभिनंदनाचा संदेश आणि तिथुनच रिप्लाय केला. गडबडीत मी ते ’सहज’ एवढेच वाचले, मला वाटले आमचे मीम कर सहजकाकाच हायती की काय म्हणुन. सवारी…लै लै सवारी आणि धन्यवाद पुन्हा एकदा 🙂

    
 10. जयश्री

  नोव्हेंबर 22, 2010 at 12:53 pm

  मनापासून अभिनंदन 🙂

   
 11. Kranti Sadekar

  नोव्हेंबर 22, 2010 at 9:31 pm

  Hardik Abhinandan!

   
 12. जयश्री

  नोव्हेंबर 23, 2010 at 11:50 सकाळी

  असाच लिहिता रहा …. !!
  भेटीचा योग दिसतोय लवकरच 🙂

   
  • विशाल कुलकर्णी

   नोव्हेंबर 24, 2010 at 9:57 सकाळी

   डिसेंबरमध्ये येतेयस ब्लॊग माझाच्या कार्यक्रमात? ये ना, मजा येइल 🙂

    
 13. Gangadhar Mute

  नोव्हेंबर 23, 2010 at 5:19 pm

  भेटीचा योग मला पण दिसतोय बर कां.

   
  • विशाल कुलकर्णी

   नोव्हेंबर 24, 2010 at 9:56 सकाळी

   अर्थात दादा, काही नाही तरी डिसेंबरमध्ये ब्लॊग माझाच्या कार्यक्रमात आपली भेट होइलच 🙂

    
 14. रोहन

  नोव्हेंबर 24, 2010 at 12:09 सकाळी

  स्पर्धेतील यशासाठी खूप खूप अभिनंदन… 🙂

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: