भल्या पहाटे, किंवा सुर्योदयाच्या वेळी किंवा कातरवेळी किंवा फ़ारतर सुर्यास्ताच्या वेळी आकाशाचे निरनिराळे विभ्रम टिपणे हा बहुतेकांचा छंद असतो. पण भर माध्यान्ही आकाश टिपणं हा देखील एक वेगळाच अनुभव असतो. अशाच एका ऐन उन्हाळ्यातील दिवशी भर दुपारी दिड – दोन वाजता टिपलेल्या त्या मित्राच्या या लोभस छटा…..
सोलापूराहुन तुळजापूरास जातानाच्या मार्गावर….
सोलापूराहून तूळजापूरला जाताना १०-११ किमी वर असलेलं हिप्परगा येथील जागृत अशा श्री गजाननाचं दर्शन घेवुन पुढे निघालं की उजव्या हाताला हिप्परग्याचं बारमाही भरलेलं तळं लागतं.
बहुदा स्वत:च्याच उष्म्यापासून लपण्यासाठी म्हणून सुर्याजीरावांनी चक्क ढगांचा आडोसा घेतला. हळूच कानोसा घेत आमच्याबरोबर लपाछपी खेळायला सुरूवात केली.
शेवटी आमच्या कोडगेपणाला कंटाळून स्वत:च डोके बाहेर काढले.
प्रकाशच प्रकाश…, आता कुठे लपणार?
आता तुमच्यावर राज्य, मी लपणार….!
तुळजापूरला पोहोचेपर्यंत आमचा खेळ चालुन होता. आता ४ तारखेला परत सोलापूरी चाललोय, तेव्हा आईच्या दर्शनाला जाणे होइलच. तेव्हा पुन्हा लपाछपी, पुन्हा मज्जा………………
विशाल.
महेंद्र
नोव्हेंबर 2, 2010 at 10:26 सकाळी
सुटी काढलेली दिसते.. मजा करा. मी पण नाशिकला जातोय गुरुवार पासून..
विशाल कुलकर्णी
नोव्हेंबर 2, 2010 at 11:01 सकाळी
व्वा, तूम्ही नाशिकचे का ? नाशकात एक खुप जवळचे स्नेही आहेत माझे, तुम्ही ओळखत ही असाल कदाचित. सी.एल. उर्फ़ चारुदत्त कुलकर्णी. ट्रॊफ़ीज वगैरे बनवण्याचा व्यवसाय आहे त्यांचा. ते स्वत:ही उत्तम कवि आहेत. परवाच पं. शौनक अभिषेकींनी त्यांच्या कवितांचा एक अल्बम केलाय. ’पश्चिमेचा सांजवारा’ या नावाने. मला एकदा जायचेय त्यांच्याकडे, इतक्यात नाहीच गेलेलो.
मी ५ तारखेपासुन रजेवर जातोय. १५ लाच परत येणार. आधी सोलापूर मग नंतर जमल्यास कोकण किंवा उटी . बंगळुरू असा बेत आहे, बघु कसे जमते ते!
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
अजय
सप्टेंबर 2, 2012 at 6:30 सकाळी
लपाछपीचा खेळ बघून बालपण आठवले.छान आहेत फोटो.
विशाल कुलकर्णी
सप्टेंबर 3, 2012 at 12:36 pm
धन्यवाद अजयजी 🙂
महेश कुलकर्णी
जानेवारी 10, 2013 at 6:00 pm
मस्त,छान,लपाछपीचा’खेळ,