कुठल्याही देशातील एखाद्या राज्याला किंवा राज्य सरकारला संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) पारदर्शकता, जबाबदार कारभार आणि क्रुतीशी्लतेसाठी असलेला अत्युच्च दर्जाचा पुरस्कार मिळणे हि त्या राज्यासाठीच नव्हे तर त्या देशासाठीदेखील अतिशय अभिमानाची, गौरवाची आणि आनंदाची बाब असते.
या वर्षीचा संयुक्त राष्ट्रांचा पारदर्शकता, जबाबदार कारभार आणि क्रुतीशी्लतेसाठी असलेला द्वितीय सर्वोच्च दर्जाचा पुरस्कार भारतातील गुजरात या राज्यास मिळाला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाच्या भिंतींना सुशोभीत करत असलेले हे सर्टिफ़िकेट त्याचे प्रमाण आहे.
गेल्या वर्षी देखील गुजरात सरकारने राबवलेल्या तिथल्या स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा योजनेला संयुक्त राष्ट्रांचा प्रथम पुरस्कार मिळाला होता. पण ही गोष्ट आपल्यापैकी किंबा एकुणच भारतीयांपैकी किती जणांना माहीत आहे.
पण या बातमीला कुठल्याही मिडीयाने मग ते वृत्तपत्रे असोत किंवा विविध टिव्ही वाहिन्या असोत कुणीही अगी थोडेसेही महत्व दिलेले दिसत नाही. निदान माझ्या माहितीत तरी अशी काही बातमी वाचल्याचे किंवा पाहिल्याचे आठवत नाही.
नेहमी कुठली ना कुठली संधी शोधून मोदींवर शरसंधान करणारे मिडीयावाले या एवढ्या मोठ्या गौरवाची मात्र साधी बातमीही देत नाहीत. सोहराबुद्दीनसारख्या अतिरेक्याची माहिती शोधून त्याला कव्हरेज देण्यात धन्यता मांडणारे मिडीयावले एवढी महत्वाची आणि अभिमानाची बातमी , उपलब्धी असुनही तिच्याकडे मात्र सोयिस्कररित्या दुर्लक्ष करतात.
असो गुजरात सरकारचे, राज्याचे आणि पर्यायाने श्री. नरेंद्र मोदी यांचे या पुरस्कारासाठी मन:पूर्वक अभिनंदन.
देशातील इतर राज्ये याचा आदर्श ठेवून कारभार करणार काय? निदान आपला महाराष्ट्र तरी……….
खालील लिंकवर (संयुक्त राष्ट्रांची वेबसाईट) इतर विजेत्यांची माहिती उपलब्ध आहे.
http://unpan1.un.org/intradoc/groups/public/documents/un-dpadm/unpan039144.pdf
विशाल.
सचिन
ऑक्टोबर 27, 2010 at 1:28 pm
गुजरात सरकारचे, राज्याचे आणि पर्यायाने श्री. नरेंद्र मोदी यांचे या पुरस्कारासाठी मन:पूर्वक अभिनंदन.
बाकी मिडियाबद्दल काय बोलायचं ? त्यांना फक्त टीआरपी शी मतलब आहे.
विशाल कुलकर्णी
ऑक्टोबर 27, 2010 at 2:08 pm
खरय मित्रा !
सुहास
ऑक्टोबर 27, 2010 at 2:31 pm
ओह्ह्ह्ह खूपच अभिमानस्पद माहिती विशाल…
गुजरात सरकारचे अभिनंदन…आपल्याकडे ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत मीडीयाला..पेड न्यूज़ बस वर्तमानपत्रांमध्ये आता हे फॅड आलय पण न्यूज़ चॅनेल्स ने हे खूप वर्षा आधीच हे…..
सोड काय बोलायच यावर..
विशाल कुलकर्णी
ऑक्टोबर 27, 2010 at 3:07 pm
नाहीतर काय? कुणी बोअरवेलमध्ये पडला पोचले मिडीयावाले, कुणा फ़िल्मस्टारने दारु पिउन हंगामा केला पोचले मिडीयावाले, ताजवर होणार्या हल्ल्याचे लाईव्ह शुटींग करायला (शत्रुपर्यंत आपल्या तयारीची माहिती पोचवायचे महत्वाचे काम करत) एका पायावर तयार.
Gujarat riots which took place in 2002 where Hindus also were burnt alive, and Not a single Hindu family was interviewed or shown on TV whose near and dear ones had been burnt alive in Godra,
PARVEZ MUSHARAF ATTACKED INDIA THROUGH KARGIL BUT THE INDIA TODAY GROUP INVITED HIM TO ITS CONCLAVE. SO HE CAN BLUNTLY SAY WHAT HE DID IS RIGHT. And we have to listen that, IT IS TOTALLY UNFORTUNATE.
अर्थात यात किती प्रतिशत खरेपणा आहे हे ती वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि वरचा देवच जाणोत. पण आग लागल्याशिवाय धुर निघत नाही हे देखील तितकेच खरे आहे ना.
सुहास
ऑक्टोबर 27, 2010 at 3:36 pm
आयला मोठा शॉक दिलास तू अजुन….लोकशाहीचा चौथा स्तंभ हा असा हेच आपल दुर्दैव..
जेव्हा, आपल्या इथे दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मीडीयाने ती दृष्य परत परत दाखवून एवढा रक्त आटवल होत सांगू..जवान यहा से हमला करेंगे, वो टेरेस पर उतर गये, सिधी तस्वीरे उन लोगो की, ये लाशे…डोक काय घरी ठेवतात का ही लोक? (खूपच शिव्या द्यायचा मूड आहे पण ..) काही अक्कल नाही साल्ल्यांना आणि हीच वेळ अमेरिका किवा यूरोप आली तेव्हा त्यानी मीडीयाचा कंट्रोल घेऊन काय दाखवायचे सांगितले होते ते खूप कौतुकास्पद होत…म्हणून साले ते पुढेच आहेत आणि आपण मागे 😦
Amol Deshpande
ऑक्टोबर 27, 2010 at 3:40 pm
Hi, Vishal
Gone though ur comment regarding Media… at last u said अर्थात यात किती प्रतिशत खरेपणा आहे? so here i am posting a link, go through it….also read government rule for FDI in media
http://www.bhagwad.com/blog/2010/politics/indian-media-debunking-ownership-myths.html
विशाल कुलकर्णी
ऑक्टोबर 27, 2010 at 4:19 pm
अमोलभाऊ, खुप खुप आभार या माहितीसाठी. मी तर क्षणभर घाबरलोच होतो ती मेल बघुन. अर्थात या अशा चेनमेल्स मध्ये फ़ारसे तथ्य नसते हे माहीत आहे तरीही थोडीफ़ार शंका घ्यायला जागा उरतेच ना? असो. आता छातीवरचे ओझे उतरले 🙂
धन्यवाद आणि सुहासभाऊ क्षमस्व वर दिलेल्या चुकीच्या माहितीबद्दल. ती माहिती मी संपादीत करतोय. 🙂
nayanraut
ऑक्टोबर 27, 2010 at 9:21 pm
खुपच महत्वाची बातमी दिलीस मित्रा, मिडियाकडून ह्या बतामिची अपेक्ष्या ठेवणे चुकीचे आहे कारण ह्या बातमीत T.R.P. नाही.
मी काही भाजपचा चाहता नाही पण मी स्वतः गेली १० वर्ष गुजरात फिरलोय, पेट्रोल पंपावर माझ काम असल्याने मी देशभर खूप फिरलोय आणि खरच गुजरात भारतातल सगळ्यात आदर्श राज्य आहे. पाणी, वीज, रस्ते आणि एकंदरीत राहणीमान ह्यात गुजरात देशातल्या इतर कुठल्याही राज्याच्या २०-३०% पुढे आहे. अगदी आपल्या राज्याच्याही पुढे.
विशाल कुलकर्णी
ऑक्टोबर 28, 2010 at 7:59 pm
मी पण नाही. भाजपाच काय आता कुठल्याच पक्षावर विश्वास उरलेला नाही. पण जे चांगलं आहे, होतय त्याला चांगलं म्हणण्याचा चांगुलपणा आपल्या मिडीयाकडे नाही. त्यांना फ़क्त काहीतरी सनसनाटी हवं असतं. शाहरुख खानला शिंक आली यावर ते आठवडाभर बोलु शकतात, पण कोणी चांगले काम करतोय ही त्यांच्या दृष्टीने दुय्यम गोष्ट असते.
मनोहर
ऑक्टोबर 27, 2010 at 10:20 pm
सकाळी अमित शहा केसची हायकोर्ट सुनावणी करणार असल्याचे मिडियाने सांगितले. नंतर बातमी ब्लॅकआऊट झालेली आहे.
विशाल कुलकर्णी
ऑक्टोबर 28, 2010 at 7:56 pm
हे असेच व्हायचे 🙂
महेंद्र
ऑक्टोबर 28, 2010 at 7:49 pm
काही गोष्टींकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं जातं , त्यातलीच ही एक.
विशाल कुलकर्णी
ऑक्टोबर 28, 2010 at 7:55 pm
खरे आहे दादा आणि हेच आपले सगळ्यात मोठे दुर्दैव आहे. 😦
thanthanpal
ऑक्टोबर 29, 2010 at 6:11 pm
आज मिडिया पूर्णपणे विकतच्या बातम्या छापतो मुंबई पुण्या सकट वा TV वर दाखवतो. कारण सर्वच जग पैश्या भोवती फिरते आहे. बाबूजी तुम क्या क्या खरीदोगे यहां तो हर चीज बिकती है ! अशी परिस्थिती झाली आहे.
विशाल कुलकर्णी
नोव्हेंबर 1, 2010 at 10:34 सकाळी
खरय दादा, दुर्दैवाने ही परिस्थिती आहे खरी ! 😦
dtawde
फेब्रुवारी 29, 2012 at 5:33 pm
for सोहराबुद्दीनसारख्या अतिरेक्याची माहिती – http://hinduawaken.wordpress.com/2012/02/29/myth-12-the-photo-of-qutubuddin-ansari-is-genuine/
हि लिंक वाचल्यानंतर बर्याच गोष्टी समोर येतील …. आपण हि लिंक वाचा.
विशाल कुलकर्णी
मार्च 5, 2012 at 1:11 pm
धन्यवाद ! ते आर्टिकल मी याआधीही वाचलेले आहे. 🙂
haris
जुलै 10, 2012 at 7:28 pm
great one i like respect your eforts