RSS

पोवाडा – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा – राज ठाकरेंचा

21 सप्टेंबर
पोवाडा – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा – राज ठाकरेंचा

सदर पोवाडा हा चालीत म्हणण्यासाठी काही ठिकाणी काही शब्दांची द्विरुक्ती होवू शकते.
(पोवाडा वाचतांना मागे डफ वाजतो आहे अशी कल्पना करा.)

स्टाँग डिस्क्लेमर: माननिय बाळासाहेबांचा व राज ठाकरेंचा मी आदर करतो व यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. तत्राप कोणाला कोणतेही आक्षेप असतील तर हा पोवाडा माझा वैयक्तिक समजावा. पोवाड्यातील काही वाक्ये मनसे च्या अधिक्रुत वेबसाईटवरून घेतलेली आहेत.

पहीले वंदन धरणी मातेला sssssमातेला,
नंतर वंदून मराठी मातीला..
वंदतो शिवाजीराजांना
वंदन माझे मावळ्यांना
वंदतो संयूक्त महाराष्ट्राच्या हुताम्यांना…
वंदतो आई बापाला…
वंदतो हिंदवी सैन्याला….
वंदतो झाशीच्या राणीला
वंदून थोरामोठ्यांना…
शाहीर सचिन बोरसे करतो पोवाड्याला
जी र हा जी जी जी जी जी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापूनी sssssss
महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापूनी… स्थापूनी
केले उपकार राज ठाकरेन राज ठाकरेंनी… राज ठाकरेंनी… राज ठाकरेंनी
मरगळलेला महाराष्ट्र जावून…
घेतली उभारी मराठी मनानंss मनानं ss जीरहा जी जी जी…

{गद्य : २००० च्या दशकात अचानक जिकडेतिकडे भैया लोकांचा संचार सुरू झालेला होता…
रेल्वे तर त्यांच्या बापाचीच मालमत्ता आहे असे समजून भैये लोक वागत होते…
कारखान्यात कमी रोजंदारीवर भैया लोक भरती होत होते… अशा वेळी…..}

महाराष्ट्रावर जोरदार हल्ला झाला भैया लोकांचा
अन कारखान्यात बट्याबोळ झाला आपल्या रोजीचा
रेल्वे भरतीत केला चालूपणा लालूने
साथ दिली त्याला तिकडे मुलायमसिंगने
अमरसिंग आहे तो तर त्याच जातीचा
मनातले त्यांच्या हाणून पाडायचा बेत राज ठाकरेंचा

{गद्य : अशा वेळी लालू, मुलायम, अमरसिंग व ईतर उत्तर भारतीय एकत्र आले…
मुंबईत छट पुजा करायची…. उत्तर भारतीय दिवस साजरे करायचे…. असले कार्यक्रम त्यांनी राबवायला सुरूवात केली….}

मुंबई तो हमारीच माई, बोलले युपीचे भाई
काम हम यहीच करेंगे, पैसा सब गाव ले जायेंगे (अहा)
राम आयेगा यहा… तो लछमन को भी यहा लायेंगे

{गद्य : असल्या वल्गना हे भैया लोक करत असत…
येथे राहून, येथे काम करून सगळा पैसा ते युपी बिहारात नेत असत….
ते येथे एकटे येत असल्यामुळे येथील पोरीबाळींवर आयाबहीणींवर त्यांची वाईट नजर असे…
अशा ह्या महाराष्ट्रावर आलेल्या वाईट वेळी महाराष्ट्राकडे लक्ष देणारे होतेच कोण?}

महाराष्ट्राचे पुढारी फाडारी
बसले होते दिल्ली दरबारी… दिल्ली दरबारी
हाजी हाजी करू चालू होती सोनीयाची चाकरी…चाकरी (अहा..)
बसले होते मुग गिळुन… बोलत होते आवो आवो महाराष्ट्र
संयूक्त महाराष्ट्रासाठीचे विसरले घेतलेले कष्ट…
असले आपले भ्रष्ट नेते नतद्रष्ट अन भैये झालेत पुष्ट…

{गद्य : आपणच लोकसभा, विधानसभेसाठी निवडुन दिलेले नेते दिल्ली, मुंबईत नुसते तोंड बंद करून बसले होते….
पवार, पाटिल, देशमूख असली सरदारे दिल्ली दरबारात मुजरे करत होते…
मराठी जनतेची चाकरी करायची सोडून ईतर संघटना, पक्ष हेही भैया लोकांची चाकरी करीत होते….
भैया लोकांनी पुरवीलेल्या पैशावर मस्ती चालत होती…
ईकडे भैयांचा लोंढा महाराष्ट्रात येतच होता…. अत्याचार वाढतच होता…}

स्थिती ओळखली राज ठाकरेंनी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापियली
एकत्र जनता मराठी आली
युपी बिहारची जनता हादरली….

{गद्य : महाराष्ट्रावर पडलेल्या संकटकाळी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली.
ज्या ठिकाणी आपले पोट भरते त्या महाराष्ट्राला आपले मानणारे जर युपी बिहारातले असतील तर तेही मराठी बांधव आहेत असे उदात्त विचार मांडणार्‍या या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेत्रूत्व मराठी मनाचे पुरस्कर्ते राज ठाकरेंनी करावे हे महाराष्ट्राचे भाग्यच.}

महाराष्ट्रात राहणारा, राहणारा
महाराष्ट्रात जन्मणारा, जन्मणारा
मराठी बोलणारा, बोलणारा
मराठी मातीला आपलं मानणारा, मानणारा
तोच मराठी माणुस अभिप्रेत राजेंना…राजेंना

{गद्य : जे मूल मराठी आई-वडिलांच्या पोटी जन्माला आले आहे ते तर मराठीच! पण त्याचबरोबर इतर भाषिकांमध्येही जो महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे, जो महाराष्ट्रावर प्रेम करतो आणि मराठी भाषा उत्तम बोलतो, आणि महाराष्ट्रात राहतो त्या माणसाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणूसच मानते. त्या सर्वांची समृद्धी आणि विकास महाराष्ट्र नवनिर्माण सेना महत्त्वाचा मानते.
अशा या विचारांत काय वाईट आहे हो? जे जे युपी बिहारातल्या बांधव येथे राहून जर ते मराठी मनाचा, मराठी जनांचा, मराठी अस्मितेचा सन्मान करतात त्यांना दुखवायचे काय कारण?
आम्हालाही प्रगती करायचीय, स्वातंत्रानंतरही आपण फक्त चांगले रस्ते, पाणी ईत्यादी गोष्टींसाठीच आग्रह करत होतो…. आता ती वेळच येणार नाही… कारण….}

भौतिक, सांस्कृतिक वैभव महाराष्ट्राचे
कर्तव्य आहे आपले प्राप्त करण्याचे…
समस्यांची सोडवणूक करणे,
सर्व जाती, धर्म, पंथ, वर्गांचे…
एकत्र येवूण विकास करण्याचे….
उद्देश असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे

{गद्य : विकासाआड येणारे सत्तागटांशी सर्व पातळींवर संघर्ष करणे,विकास करण्यासाठी रचनात्मक व संघर्षात्मक कामे करणे, सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा, मराठी पाट्यांचा आग्रह धरणे,महाराष्ट्रातील रस्ते, आरोग्य, व्यापार, शेती, वीज, पाणी, शिक्षण, पर्यटन, महिला, कामगार, विद्यार्थी, आदिवासी, कायदा व सुव्यवस्था, क्रीडा, उद्योग, वित्त, गृहखाते, सहकार, रेल्वे, केंद्र-राज्य संबंध या क्षेत्रांतील सर्व प्रश्नांची तड लावणे आणि त्यात मराठी माणसाचे सर्वंकष वर्चस्व स्थापित करणे, ही पक्षाच्या कार्याची मुख्य दिशा आहे.}

{गद्य : भौतिक व सांस्कृतिक समृद्धीचे शिखर गाठलेला, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र व मराठी माणूस बनवणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठीच ह्या पक्षाचा जन्म झाला आहे. }

मराठी माती अन मराठी विचार….
बाळासाहेबांसारखे रक्तात मुरले माझ्या छान…. (अहा)

महाराष्ट्राचा विकास हेच ध्येय्य आयुष्याचे
त्यासाठीच जन्म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे

असे हे विकासाचे राज ठाकरी विचार…
शाहीर सचिन बोरसे मुजरा करी त्रिवार…. जी र हा जी जी जी जी जी

– शाहीर सचिन बोरसे
०३/०९/२००९
स्टाँग डिस्क्लेमर: माननिय बाळासाहेबांचा व राज ठाकरेंचा मी आदर करतो व यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. तत्राप कोणाला कोणतेही आक्षेप असतील तर हा पोवाडा माझा वैयक्तिक समजावा. पोवाड्यातील काही वाक्ये मनसे च्या अधिक्रुत वेबसाईटवरून घेतलेली आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: