भावमुद्रा !
श्री. प्रमोदकाका देव यांच्या संग्रहातुन (त्यांच्या पुर्वपरवानगीने) काही दिग्गज संगीत साधकांच्या दुर्मीळ भावमुद्रा !
सौजन्य : श्री. प्रमोदकाका देव
भारतीय शास्त्रीय संगीतातील एकेका दिग्गजांबद्दल माहिती करून घेण्याचा मी गेले काही दिवस प्रयत्न करतोय. पण त्यांच्या गाण्याबद्दल काही बोलण्याइतपत माझा अधिकार नसल्यामुळे मी आपला त्यांच्या मोहक अदाकारीवरच लक्ष केंद्रित करायचे ठरवले. नादब्रह्मात रंगलेले कलाकार पाहण्यातही एक वेगळेच संगीत आहे असा एक अलौकिक साक्षात्कार मला ह्या दरम्यान झाला.
माझे एक आवडते गायक डॉ. वसंतराव देशपांडे ह्यांच्या काही भावमुद्रा इथे पेश करत आहे.
वसंतराव गायनाइतकेच तबलावादनातही तितकेच उस्ताद होते हे कदाचित आपल्याला माहीत नसेल.
मैफिलीत रंगलेले वसंतखां
तंबोरा जुळवण्यात गुंग
कोणत्याही एका घराण्याशी बांधिलकी न मानणार्या वसंतरावांनी सगळ्या घराण्यांच्या गायकीतले उत्तम तेच उचलले आणि स्वत:ची स्वतंत्र गायन शैली निर्माण केली. भीमसेनांप्रमाणेच मी वसंतरावांनाही माझे मानस गुरु मानतो. त्यांच्या गाण्याचा मी निस्सीम चाहता आहे. वसंतराव गात असताना मधनं मधनं काही मार्मिक टिप्पणी देखिल करत जी देखिल तितकीच श्रवणीय आणि महत्वाची असे.
वसंतरावांच्या मैफिलीची ही एक झलक पाहा. राग अहिर भैरव
पं. जसराजजी
भारतरत्न पं. भिमसेन जोशी
आणि हा एक दुर्मिळ फ़ोटो…. बसंत बहार या चित्रपटात मन्नादा आणि पंडीतजींनी मिळून एक अजरामर जुगलबंदी सादर केली होती. त्या वेळचा हा एक दुर्मिळ फ़ोटो….
या गाण्याची ध्वनिफ़ीत येथे पाहता तसेच ऐकता येइल. : केतकी बसंत जुही….
अजुन एक असाच दुर्मिळ संयोग…
स्व. सुधीर फडके उर्फ बाबुजी
पं. हरिप्रसाद चौरसिया
पं. जितेंद्र अभिषेकी
उस्ताद अमजद अली खां साहब
स्व. पं. मल्लिकार्जुन मन्सुरजी
पंडित कुमार गंधर्व!
पंडित कुमार गंधर्व! मूळ नाव शिवपूत्र सिद्धरामय्या कोमकली. घराण्याची चौकट न मानणारा हा कलंदर गायक स्वत:च एक ‘स्वतंत्र घराणे’ होऊन बसला. आजारपणामुळे एक फुफ्फुस गमावूनही त्यांची गायकी आक्रमक होती. ताना तुटक तुटक पण अतिशय जोरकस असत. तशा ताना घेणे हे एरागबाळाचे काम नोहे.
प्रेषक प्रमोद देव ( सोम, 06/02/2008 – 22:00) .
श्री. प्रमोदकाकांपासुन प्रेरणा घेवुन मी देखील दुर्मीळ छायाचित्रे शोधण्यास सुरुवात केली.
असाधारण गुरुशिष्यांची अपुर्व जोडी : उस्ताद करीमखाँ साहब आणि सवाई गंधर्व !
anish
सप्टेंबर 29, 2009 at 11:01 सकाळी
superb collection. keep it up.
anish
एप्रिल 20, 2010 at 2:29 pm
SHASTRIY SANGIT GAYAKANCHYA YA YEVDHYA BHAVMUDRA PAHUN AAGDI BHARUN AALE.SUNDER SANGRAH AAHE. DHANYAVAD.
Kulkarni Vishal
एप्रिल 20, 2010 at 2:55 pm
धन्यवाद अनिशजी !
nandan1herlekar
डिसेंबर 6, 2010 at 9:51 pm
दुर्मिळ फोटोंची अनोखी मेजवानी मिळाली आणि माझी काही दैवतेही पहावयास मिळाली आपल्या कृपेने. धन्यवाद!
विशाल कुलकर्णी
डिसेंबर 7, 2010 at 4:35 pm
धन्यवाद नंदनजी ! खरेतर आभार प्रमोदकाकांचे मानायला हवेत मी !
vishnupant Mangde
नोव्हेंबर 23, 2011 at 11:07 सकाळी
kay solid manus ahe rao . kharach tumchy paya padayla pahije
विशाल कुलकर्णी
नोव्हेंबर 23, 2011 at 12:00 pm
आभार्स विष्णुपंत 🙂
Aruna Pentewar
मे 14, 2012 at 1:02 pm
Excellent Job…………..very nice collection good work………..
विशाल कुलकर्णी
मे 14, 2012 at 2:13 pm
धन्यवाद अरुणाजी 🙂
Aruna Bharat Pentewar
जानेवारी 30, 2014 at 12:01 pm
ekdam Zakaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaas…………………………………………………………………………………………………………… atishay durmil ahet he sagle photographs
विशाल विजय कुलकर्णी
जानेवारी 30, 2014 at 12:09 pm
Thanks Arena .